Let’s Learn Music: Newly admitted students welcomed with enthusiasm at Jijamata College through cultural programs
बुलडाणा:
श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित स्थानिक जिजामाता महाविद्यालय बुलडाणा येथे “चला संगीत शिकूया” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश गवई, यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
संगीत विभाग ,कल्चरल सेल व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने दीक्षा आरंभच्या निमित्ताने उपस्थित महाविद्यालयातील सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी विद्यार्थी,प्रसिद्ध कलावंत,गायक, गीतकार विशाल कुमार मोरे यांचा मा.प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संगीत विभागातील नवीन प्रवेशीत विद्यार्थी तसेच द्वितीय वर्षाला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रम सादरीकरणां मध्ये सहभाग घेतला होता. कु. शारदा थोरात हिने सत्यम शिवम सुंदरम हे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर नटरंग उभा हे चित्रपट गीत संगीत विभाग प्रमुख प्रा गजानन लोहटे व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सादर केले. त्यानंतर आदिती खरात या विद्यार्थिनींने राधा राधा करी बासरी ही गवळण सादर केली. त्यानंतर समाधान राऊत व पंकज चव्हाण यांनी तोरे नैना बडे दगाबाज हे गीत, त्यानंतर साक्षी हिवाळी या विद्यार्थिनीने तुझसे नाराज नही जिंदगी, त्यानंतर कु आशु राऊत या विद्यार्थिनीने बासरीवर साथिया तुने क्या किया हे चित्रपट गीत सादर केले.
जाहेद शेख या विद्यार्थ्यांनी गिटारवर चित्रपट गीताचे वादन सादर केले. दीपरत्न जाधव यांनी मला वेड लागले प्रेमाचे, सच कहे रहा हे आदी मराठी चित्रपट गीते सादर केले युवा गायक विशाल कुमार मोरे यांनी हरणी वाणी तुझं चालणं हे गीत युवकांच्या काळजाचा ठाव घेत विशेष अंदाजात सादर केले. शेवटी संगीत विभाग प्रमुख प्रा. गजानन लोहटे यांनी मॅशअप द्वारे होटो से छू लो तुम , कभी कभी मेरे दिल मे, एक प्यार का नगमा है, तुमको देखा तो ये ख्याल आया, इ गीतानंतर मिले सुर मेरा तुम्हारा ह्य भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.
तबलासाथ- संगत संकेत बगाडे, ढोलक- शाम मानकर व शंतनू सरदार, की बोर्ड -डॉ.मनोज गुरव , टाळ साथ – समाधान राऊत, हार्मोनियम साथ- प्रा. गजानन लोहटे व प्रसिद्ध युवागायक विशाल कुमार मोरे यांनी केली. अशाप्रकारे नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरंभ अतिशय उत्साहात व जल्लोषात झाला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धाचे, युवा महोत्सवाचे, सांस्कृतिक विभागाचे, तसेच विविध वाद्य प्रकार कलाप्रकार विषयी समजावून सांगण्यात आले तसेच त्यापासून मिळणारे क्रेडिट व गुण इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रतिभेला सुद्धा सादरीकरणाच्या माध्यमातून संधी प्रतिभेला वाव मिळाला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाला आय क्यू एसी समन्वयक प्रा. डॉ सुबोध चिंचोले, शाखा प्रमुख प्रा. डॉ. जे. जे. जाधव, प्रा. डॉ. एस. एल. कुंभारे, प्रा. डॉ. गणेश किरोचे , तसेच डॉ. भरत जाधव, प्रा. विनय पैकीने , डॉ. नामदेव ढाले, प्रा. खंदारे, प्रा. संजय सोनुने, डॉ. अनंत मोरे डॉ.योगेश रोडे, डॉ.राहुल उके ,डॉ.आनंद देशपांडे डॉ.प्रदीप वाघ , डॉ राजेश्री येवले, प्रा रामेश्वर बनकर, डॉ विकास पहूरकर,प्रा.संजय साळवे डॉ. राजश्री येवले, सौ. माधुरी पुनसे , श्री. दिलीप मोरे श्री. धनंजय ताठे, सचिन चव्हाण, धनंजय ताठे गजानन सुसर,अशोक जाधव, श्रीमती. देऊबाई भोंडे, शेख अर्शद , भगवान उबाळे, तसेच सूरज चव्हाण, राजश्री शिरसाठ सौरभ मेटकर, कुणाल दराखे, आदित्य जाधव,मयुर कंकाळ, रोहित बंडे, सिद्धार्थ सरकटे या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.