बुलढाणा न्यूज
भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहर मंडळ चिटणीसपदी किरण मंगलराव नाईक यांची प्रदेशाच्या व जिल्ह्याच्या मान्यतेने बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी एका नियुक्ती पत्रकाव्दारे त्यांची निवड केली आहे.
सदर नियुक्ती त्यांच्या गत काळातील सामाजिक व राजकीय कार्याचा तसेच अनुभवाची दखल घेत निवड केली. तसेच किरण नाईक यांच्या अनुभवाचा पक्ष संघटनेच्या कार्यावाढीसाठी हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत सोबतच भाजपा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे किरण नाईक यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले, असल्याने किरण मंगलराव नाईक यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे.