शिवसेना युवा नेते सुनिल मान्टे यांची मागणी
बुलढाणा न्यूज टिम
सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील शिवसेना युवा नेते तसेच ग्रा.पं.सदस्य सुनिल मांन्टे यांनी घरकुल लाभार्थीना शासनामार्फत दहा ब्रास रेती व तीन लाख रुपयांची घरकुलासाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
यावेळी त्यांनी पंचायत समितीला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ज्या लाभार्थीना घर बांधण्यासाठी जागा नाही, त्यांना शासकीय जमीनवर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच पंचायत समिती अंतर्गत कोणत्याही लाभार्थ्यांना घरकुलांच्या हप्त्या बाबत त्रास देऊ नये. यावर शासनाने लक्ष द्यावे व प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुल मिळाले पाहिजे व घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये, शिवसेना युवा नेते सुनिल मान्टे यांची मागणी त्यांनी पंचायत समितीला एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.