बुलढाणा न्यूज
भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक शहर मंडलाच्या अध्यक्षपदी मोहम्मद अखिल यासीन खान उर्फ हाजी खान यांची नियुक्ती भाजपाचे शहर अध्यक्ष मंदार बाहेकर यांनी आज दिनांक १३ जुलै २०२५ रोजी केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या आदेशान्वये शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे संघटन मजबूत करण्याकरिता ही जबाबदारी मोहम्मद अकिल यासीन खान यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांचे सामाजिक राजकीय काम पाहून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर अल्पसंख्याक समाज आणि शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठे संघटन उभे राहणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.