धाड ग्रामपंचायतमधील अनागोंदी कारभारा विरोधात न्यायालयात दाद मागणार : रिजवान सौदागर

बुलडाणा
तालुक्यातील धाड ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप करून ग्रामपंचायतमधील अनागोंदी विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती धाड ग्रामपंचायतचे माजी सरपंच रिजवान सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक पत्रकार भवन येथे रविवार १३ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना ते पुढे म्हणाले की, दोन जणांना काही महिती नसतांना त्यांच्या नावावर ग्रापंचायतचा चेक देवून पैसे काढले. याबाबत जिल्हा परिषद मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याकडे लक्ष न दिल्यामुळे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली.

त्यानंतर अहवाल मागितल्यावर जिल्हा परिषद मुख्याधिकार्‍यांनी त्यामध्ये नमूद केले की, त्या लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले. त्यांनी ते पैसे काढले परंतू यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही. तसेच अतिक्रमण प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्यानंतर सुध्दा दिलेल्या मुदतीत ते अतिक्रमण काढण्यात आलेले नाही, त्यामध्ये काही कारवाई दाखवावी यासाठी काही अतिक्रमण काढले व काही राहू दिले, ग्रामपंचायत सदस्याच्या नातलगाला ग्रामपंचायतचे टेंडर देता येत नाही. तरी टीका खान यांना टेंडर देण्यात आले. बांधलेली नाली रातोरात अज्ञात व्यक्तीने तोडून टाकली.

त्याप्रकरणी धाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली परंतू पोलिसांनी चौकशी केली नाही. तसेच पुन्हा ती नाली बांधण्यात आली, प्रकरणी जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे तक्रार दाखल केल्यावर त्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. या सर्व यंत्रणांवर दबाव आहे. सर्व अधिकारी हे खाजगीत सांगतात की, मुंबई वरून दबाव आहे. त्यांचे नाव माहित आहे. परंतू माझ्या जीवाचे बरे वाईट होवू शकते त्यामुळे त्यांचे नाव घेणार नाही. असेही ते म्हणाले. यावेळी धाड ग्रामपंचायत सदस्यांचीही उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें