श्री संत नरहरी नाथ महाराज सेवा समितीची स्थापना

देऊळगाव राजा
शहरात आमना नदीच्या तीरावर तीनशे वर्षांपूर्वीचे कलात्मक पद्धतीने बांधण्यात आलेले श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान या संस्थांन ला फार मोठा इतिहास असून या ठिकाणी एका छत्राखाली महर्षी वशिष्ठ वेद विद्यालय व श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय श्रीक्षेत्र देऊळगाव राजा हे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालविण्यात येत आहे. या दोन्ही विद्यालयात बाहेरगावचे विद्यार्थी यांनी प्रवेश घेतलेला आहे तर हे दोन्ही विद्यालय निवासी असून विद्यार्थ्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही महाराष्ट्रातील हे पहिलेच असे संस्थान आहे की या एकाच ठिकाणी दोन्ही विद्यालय सुरू आहेत.

शासनाकडून अध्यापही या संस्थांनला आर्थिक मदत मिळालेली नसून लोक सहभागातून या दोन्ही विद्यालयाचे सर्वच कामकाज सुरू आहे . शासनाकडुन या संस्थानला “क”तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता दिलेली आहे.मात्र निधी ची तरतूद केलेली नाही.या संस्थांच्या विकासासाठी ह.भ.प. वेदविभूषण श्री उद्बोध महाराज पैठणकर यांनी एक संकल्पना मांडली व परमपूज्य गुरुवर्य मोहननाथ महाराज पैठणकर यांनी या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत विविध क्षेत्रात समाजसेवा करणारे शहरातील व पंचक्रोशीतील २१ समाजसेवकांची श्री संत नरहरीनाथ महाराज सेवा समितीची स्थापना परमपूज्यश्री महाराजांच्या अध्यक्षतेत स्थापन केली.

श्रीसंत नरहरिनाथमहाराज सेवा समिती : जुगलकिशोरजी हरकुट, मनिषजी काबरा , विजुभाऊ उपाध्ये,अ‍ॅड. पुरुषोत्तमजी धन्नावत, ब्रिजमोहनजी मल्लावत, अ‍ॅड.सतिशजी नरोडे, रविंद्रजी मोहिते, अमोलजी बंग, सन्मती जैन, प्रकाश अहिरे प्रकाश खांडेभराड,हरिभाऊ नाटकर, बळीराम मापारी , माधव गीते, ज्ञानेश्वर कोल्हे सर – गोळेगाव, पंकज वाघरूळकर – वाघरूळ , गजानन घुगे सर – उंबरखेड, संतोष तिडके , राजुभाऊ बैरागी – भिवगाव, गोपीचंद कुरंगळ – सिंदखेडराजा , किसनराव खरात यांचा समावेश आहे.

लोकसहभागातून या संस्थानचा अधिक विकास होण्यासाठी समिती मधील सर्वच सदस्य प्रयत्नशील राहणार असून भविष्यात या संस्थानला शासकीय मदत मिळुन घेउन याच परिसरात टोलेजंग इमारत उभी करून येणार्‍या भक्तांसाठी भक्त निवास, दोन्हीं विद्यालयातील विद्यार्थी साठी स्वतंत्र वस्तीगृह. वयो वृध्दांना बसण्यासाठी गार्डन चे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें