21-year-old tribal married woman who came for farm labour raped
शेतमजुरीसाठी आलेल्या २१ वर्षीय आदिवासी विवाहितेवर बलात्कार
बुलढाणा न्यूज टिम
मलकापूर
मध्य प्रदेशातील ढोलकोट उतांबी येथील आदिवासी शेतमजूर कुटुंब मलकापूर येथे शेतमजुरीसाठी बोदवड रोडवरील बि.एस.एन.एल टॉवर नजीक एका शेतात कामाला होते गुरुवार, दि.१० जुलै २०२५ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास दोघांनी जबरदस्तीने त्यांच्या घरात प्रवेश करत २१ वर्षीय विवाहितेच्या पती व सासूला वीट व लोखंडी विळ्याने मारहाण करीत त्या दोघांना जखमी करून तिला विळ्याचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने सोबत नेऊन चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
वजीराबाद शिवार गट नं ८७ शेतशिवार ते बहापुरा शेत शिवारा दरम्यान एका शेतात मोहन साब्दया बरेला याने दोनवेळा बलात्कार करून पळून गेला असल्याची फिर्याद विवाहितीने शुक्रवार, दि.११ जुलै २०२५ रोजी दुपारच्या दरम्यान शहर पो.स्टे.ला दिल्यावरून शहर पोलिसांनी आरोपी मोहन साब्दया बरेला व सोबत एक अनोळखी इसम नाव गाव माहिती नाही यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला असून दोघे आरोपी फरार असून शहर पोली निरिक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि दिपक वारे करीत आहे.