११ जुलै रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Vidarbha Secondary Teachers’ Union to hold sit-in protest in front of Education Officer’s office on July 11

बुलढाणा न्यूज टिम

बुलढाणा – शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या व समस्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक ११ जुलै २०२५ रोजी धरणे / निदर्शने आंदोलन प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक , वि जा भ ज आश्रम शाळा, आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या/ समस्या शासनाकडे बर्‍याच कालावधीपासून प्रलंबित आहे.

त्यामध्ये जुनी पेन्शन योजना मिळणे, नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या परंतु टप्प्यावर असलेल्या कर्मचार्‍यांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना मिळणे, १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता निर्गमित करणे,शासकीय कर्मचार्‍याप्रमाणे शिक्षकांना १० / २० / ३० कालबद्ध पदोन्नती मिळणे, १४ नोव्हेंबर २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे टप्पा वाढ देणे, नगर परिषद मधील २००५ नंतरच्या कर्मचार्‍यांना कोणतीही पेन्शन योजना नसल्यामुळे त्यांना त्याकरिता त्वरित आदेश काढणे, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवणे, आदिवासी विभागाचा काम नाही वेतन नाही हा ८ जून २०१६ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, नक्षलग्रस्त तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणार्‍या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना एक स्तर पदोन्नती, व वाढीव घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा, सर्व भत्ते सातव्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात यावे, न्यायालयीन निर्णयानुसार आदिवासी विकास व विभाग अंतर्गत येणार्‍या कर्मचार्‍यांना मान्यता दिनांका पासून त्यांचे थकीत वेतन/ मानधन देण्यात यावे या व इतर अनेक महत्वपूर्ण मागण्यांचा शासन गांभीर्याने विचार करायला तयार नाही या मागण्या मान्य करून घेण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाचे सरचिटणीस व्ही.यु.डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले व संघटनेचे प्रांतीयअध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक ११ जुलै २०२५ रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा बुलडाणाच्या वतीने On behalf of Vidarbha Secondary Teachers’ Union District Buldana दुपारी तीन ते पाच वाजे दरम्यान बुलढाणा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे/ निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या सर्व जिल्हा ,तालुका, शहर पदाधिकार्‍यांनी तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक ,विजाभज आश्रम शाळा, आदिवासी आश्रम शाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बुलडाणा जिल्हाध्यक्ष विष्णू अवचार जिल्हाकार्यवाह सतीश शेळके तथा सर्व जिल्हा शहर तालुका कार्यकारिणीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें