A student who passed the CA exam was felicitated by Buldhana Urban Branch, Nandura.
नांदुरा – महत्त्वाची व प्रतिष्ठेची समजली जाणारी सि ए परीक्षेचा अंतिम निकाल ६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला.
या परिक्षेत नांदुरा शहरातील फुटपाथवर पाणीपुरी, भेळ इत्यादी व्यवसाय करणारे रविंद्र द्वाराकादास शर्मा यांचा मुलगा जितेंद्र शर्मा हा मे २०२५ मध्ये झालेल्या सि ए च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे, एका सामान्य पार्श्वभूमीतून आणि मर्यादित संसाधनामधून आलेल्या जितेंद्र याने कधीही परिस्थितीला आपले नशीब ठरवू दिले नाही.
रात्रंदिवस दीर्घ अभ्यासाने आणि अथक परिश्रमाने त्याने ही सि ए हि प्रतिष्ठित पदवी मिळवली आहे. तसेच नांदुरा शहरातील प्रसिद्ध व्यापारी श्री रोशनकुमार डागा यांचा मुलगा साहिल रोशनकुमार डागा हा सुद्धा सिए ची परीक्षा उत्तीर्ण झाला. जितेंद्र शर्मा याचा सत्कार नांदुरा शाखेचे स्थानिक संचालक श्री संतोषजी डोडिया यांनी केला तसेच साहिल डागा यांचा यांचा सत्कार नांदुरा शाखेचे स्थानिक संचालक अॅड.श्री.मधुसूदन राठी यांनी केला. सदर सत्कार प्रसंगी बुलडाणा अर्बन बुलडाणा नांदुरा विभागीय व्यवस्थापक सचिन झंवर, शाखा व्यवस्थापक संदीप माहेश्वरी व कर्मचारी उपस्थित होते.