बुलढाणा न्यूज टिम मोताळा
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोताळा तालुक्यात काँग्रेस पक्षाने संघटनात्मक मजबुती आणि कार्यकर्त्यांना नेतृत्व देण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण (आप्पा) कदम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी तयारी म्हणून तालुक्यातील मंडळ अध्यक्ष व सेक्टर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्तीत पिंप्री गवळी-तळणी जि.प. सर्कल मंडळ अध्यक्षपदी यशवंत विष्णू फेंगडे, पं.स. पिंप्री गवळी सेक्टर अध्यक्षपदी नाथाभाऊ चांगो पाटील, पं.स. तळणी सेक्टर अध्यक्षपदी नितिराजसिंह रामसिंह राजपूत, तरोडा-राजूर जि. प. सर्कल मंडळ अध्यक्षपदी श्रीकृष्ण निनाजी खराटे, पं.स. तरोडा सेक्टर अध्यक्षपदी प्रकाश गण्यानसिंग बस्सी, पं.स. राजूर सेक्टर अध्यक्षपदी डॉ.अनीस युनूस खान, कोथळी-पोफळी जि. प. सर्कल मंडळ अध्यक्षपदी इरफान खान युनूस खान पठाण, पं.स. कोथळी सेक्टर अध्यक्षपदी अंकोश विक्रम पवार, पं.स. पोफळी सेक्टर अध्यक्षपदी विलास शंकर पाटील, रोहिनखेड-सारोळा मारोती सर्कल मंडळ अध्यक्षपदी जयेश सुनील पाटील, पं.स. रोहिणखेड सेक्टर अध्यक्षपदी श्रीकांत सुभाष कुल्ली, पं.स. सारोळा मारोती सेक्टर अध्यक्षपदी विजय शिवाजी सोनावणे, धामणगाव बढे-लिहा सर्कल मंडळ अध्यक्षपदी रविराज अशोक महाजन (घोंगडे), पं.स. धामणगाव बढे सेक्टर अध्यक्षपदी मुख्तार हारून खासाब, पं.स. लिहा सेक्टर अध्यक्षपदी सुभाष दशरथ प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. प्रत्येक कार्यकर्ता ही पक्षाची ताकद आहे. त्यामुळे नियुक्त झालेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, सर्वांनी एकदिलाने कार्य करावे,अशी अपेक्षा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण कदम यांनी व्यक्त केली आहे.