जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या बुलढाणाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीमती प्रभाताई माळे

Mrs. Prabhatai Male appointed as the District President of Buldhana, Zilla Parishad Health Service Employees Association

बुलढाणा न्यूज टिम

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना रजि. नं. २५७/८९ बुलढाणाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीमती प्रभाताई माळे राज्यातून मिळाला पहिला मान.. बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाचा राज्यात महिलेला मिळाला आहे. पहिला मान महिलेला देऊन खर्‍या अर्थाने मातृतीर्थ माँ जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळख असणार्‍या बुलढाणा जिल्ह्याचा खरा बहुमान प्राप्त झाला आहे.

                नुकत्याच खामगांव येथे झालेल्या कर्मचारी संघटनेच्या सहविचार झालेल्या सभेत जिल्हा कार्यकारिणीची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेची मुख्य सल्लागार शिवाजीराव गवई सेवानिवृत्त गटविकास अधिकारी  तर प्रमुख अतिथी राज्य संघटनेचे मुख्य सचिव बालाजी सातपुते, राज्य कोषाध्यक्ष अध्यक्ष पुरुषोत्तम वैष्णव गटविकास अधिकारी किनवट, राज्य कार्याध्यक्ष विजय पाटील व संभाजीनगर जिल्हा शाखा सरचिटणीस गजानन घुगे उपस्थित होते.

                या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी श्रीमती प्रभाताई माळे, कार्यकारी अध्यक्षपदी कैलास आनंदे, सचिवपदी रवींद्र साठे, जिल्हा कोषाध्यक्षपदी प्रदीप मेथे, सरचिटणीसपदी विष्णु लहासे, कार्याध्यक्षपदी शरद वाघमारे, श्रीमती कविता खाडे, सुभाष ढोले, श्रीमती वैशाली वानखेडे, उपाध्यक्षपदी जितेंद्र सदाशिव, योगेश देशमुख, श्रीमती पुष्पा गायकवाड, श्रीमती  स्वाती शेंद्रे, जी.टी.इंगळे तर संघटक पदी श्रीमती स्वाती सानप, अनिल वसतकार, सुधीर डहाके, श्रीमती मोनिका गवई, सहसचिव पदी सुरेश सोनपसारे सह कोषाध्यक्षपदी विनोद घोरसडे व प्रसिद्धीप्रमुख पदी दत्ता जाधव, वसीम जापूर, विभागीय अध्यक्षपदी राजु घुगे (घाटावर ) शिवाजी हरळ (घाटाखाली) तर राज्यस्तरावर प्रतिनिधी म्हणून कैलास अंभोरे, श्रीमती  ज्योती बांगर, अमरावती विभागीय अध्यक्षपदी नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख सल्लागार चंद्रकांत धुरंदर, कडूबा सनांसे, यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें