बुलढाणा शहर भाजपाकडून न.प.मुख्याधिकार्यांना निवेदन
बुलढाणा न्यूज टिम
भारतीय जनता पार्टी, बुलढाणा शहराच्या वतीने दिनांक सोमवार, दि.७ जुलै २०२५ रोजी बुलढाणा शहरातील नागरिकांना भेडसावणार्या विविध समस्या, आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नगरपरिषद मुख्याधिकार्यांना घेराव घालण्यात आला.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाबाबतही यावेळी आवाज उठवण्यात आला. संबंधित अधिकार्यांना कडक कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच शहरातील हातगाडी, ऑटो व रस्त्यावर व्यवसाय करणार्या व्यावसायिकांची नियमित नोंदणी करणे, त्यांना ओळखपत्र देणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी लेखी मागणी करण्यात आली. याआधी दिलेल्या निवेदनांवर कोणतेही उत्तर नगरपरिषद प्रशासनाने न दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
त्याबाबत स्मरणपत्रे देखील देण्यात आली आणि पुढील काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष मंदार बाहेकर,चंद्रकांत बर्दे, दत्ता पाटील, अनंता शिंदे, अरविंद,प्रदीप बेगाणी, वैभव इंगळे, नारायण हेलगे, अजित गुळवे, विनायक भाग्यवंत, निलेश मुठ्ठे, किरण नाईक, हाजी अकिल मोहम्मद, मिलिंद कुलकर्णी, पवन बगाडे, गौरव राठोड, मुकुंद देशपांडे, प्रतीक गायकवाड, किशोर गवळी, ज्ञानेश्वर मांजरे, कुणाल अग्रवाल, करण बेंडवाल, सलमान खान आदि उपस्थित होते.