बुलढाण्यातचा सुपुत्र बनला रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन
बुलढाणा न्यूज टिम
नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रगती होत आहे. याचाच एक उत्तम नमुना म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया. आपल्या बुलढाण्याचा सुपुत्र अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ.अनिरुद्ध पाटील यांनी नुकतीच रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट (सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया) फेलोशिप यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या महत्त्वपूर्ण यशामुळे, डॉ.अनिरुद्ध पाटील हे बुलढाणा शहर आणि आसपासच्या परिसरातील पहिले रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन बनले आहेत.
डॉ.अनिरुद्ध यांनी अपोलो हॉस्पिटल्स (Bangalore) येथून ही विशेष फेलोशिप प्राप्त केली आहे. या प्रशिक्षणामुळे त्यांना रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक अचूक आणि प्रभावीपणे सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव मिळाला आहे.
रोबोटिक शस्त्रक्रिया पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आणि फायदेशीर मानली जाते. यामध्ये रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया अतिशय अचूकतेने केली जाते, ज्यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात, रक्तस्त्राव कमी होतो, लवकर आराम मिळतो आणि रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळतो. ही एक मैलाचा दगड मानली जाणारी उपलब्धी आहे. ज्यामुळे या क्षेत्रातील वैद्यकीय सुविधांमध्ये आणखी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. डॉ.अनिरुद्ध यांनी यापूर्वीही अनेक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून, आता रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते रुग्णांना आणखी चांगला उपचार देऊ शकतील.
डॉ. अनिरुद्ध म्हणाले की, या फेलोशिपमुळे मला अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळाली. यामुळे रुग्णांना अधिक सुरक्षित आणि अचूक शस्त्रक्रिया करता येतील याचा मला आनंद आहे. आपल्या भागातील पहिले रोबोटिक सर्जन बनणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. डॉ.अनिरुद्ध यांची पुढील उच्च प्रशिक्षणासाठी सेंटर फॉर स्पोर्ट्स इंज्यूरी, न्यू-दिल्ली येथे देखील निवड झाली आहे.
रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळतो
यापूर्वीही अनेक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून, आता रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते रुग्णांना आणखी चांगला उपचार देऊ शकतो. रोबोटिक शस्त्रक्रिया पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आणि फायदेशीर मानली जाते. यामध्ये रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया अतिशय अचूकतेने केली जाते हे विशेष. ज्यामुळे रुग्णाला कमी वेदना होता. रक्तस्त्राव कमी होतो, लवकर आराम मिळतो आणि रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळतो. ही एक मैलाचा दगड मानली जाणारी उपलब्धी आहे.
– डॉ.अनिरुद्ध पाटील.