मलकापूरातील आरिफ डॉनची पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी काढली धिंड

Police Inspector Ganesh Giri busted Arif Don in Malkapur

आरिफ डॉनची दहशत मोडली; शहरभर धिंड फेरीने गुन्हेगारी प्रवृत्तींना इशारा!

बुलढाणा न्यूज टिम
मलकापुर

गुन्हेगारी कारवायांमुळे मलकापूर शहराला भयभीत करणार्‍या कुख्यात आरिफ डॉनला अखेर पोलिसांनी पुण्यातून गजाआड केले आणि त्याची शहरभर धिंड फेरी काढली. वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापणे, शस्त्र बाळगणे आणि दहशत माजवण्याचे प्रकार करत आरिफ डॉनने कायद्याला थेट आव्हान दिले होते. मात्र, मलकापूर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी या गुन्हेगाराला नेस्तनाबूत करण्यासाठी नियोजन केले.


आरिफ डॉनच्या अटकेनंतर त्याला मलकापूर न्यायालयात उभे करण्यात आले. त्याच्या रिमांडवर पोलीस पथकाने त्याच्या दहशतीचा शेवट करण्यासाठी जोरदार मोहीम राबवली. त्यानंतर आरिफ डॉनला शहरभर हिंडवत, पोलिसांनी त्याच्यामुळे पसरलेल्या दहशतीवर थेट प्रहार केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही तलवार जप्ती मोहीम होती, मात्र स्थानिक नागरिकांनी याला आरिफ डॉनची धिंड म्हणूनच ओळख दिली.
या धडक कारवाईमुळे मलकापूर शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या कर्तृत्वामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या आक्रमक पद्धतीने पोलिसांनी गुन्हेगारी मानसिकतेला चाप लावल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें