युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडीया, बुलढाणाचा उपक्रम
बुलढाणा न्यूज
रायपूर
बुलढाणा जिल्हयातील मौजे रायपूर येथील संतोष राजपूत यांच्या शेतामध्ये मौजे पळसखेडभट येथील जलसाठयातील गाळ टाकण्यात आला आहे. त्यावर आंब्यांच्या रोपांची फळबाग लागवड करण्यात आली असून पर्यावरण संतूलन राखण्यासाठी व शेतकर्यांनी शासकीय योजने अंतर्गत फळबाग लागवड करुन अंतर पिके घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करावे असे प्रतिपादन, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्राची गालफाडे यांनी केले.
रायपूर- वृक्ष लागवड करतांना जिल्हा जलसंधारण अधिकारी प्राची गालफाडे, जागृती चौधरी, मिताली लांडे, संस्था संचालक राजेश शेळके, संतोष राजपूत, गजूभाऊ, सौदागर, अमोल व्यवहारे.