विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव आनंदात

Entrance ceremony at Vivekananda Gurukunj Primary School is a joyous occasion

बुलढाणा येथील विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळेत दि. २३ जून रोजी नवीन शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात प्रवेशोत्सव साजरा करून करण्यात आली. शाळेत नव्याने दाखल झालेले इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसह इतर वर्गातील विद्यार्थी व पालकांचेही शाळेचे मुख्याध्यापक गजानन इंगळे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

उन्हाळ्याची सुट्टी संपवून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर उत्साह दिसून येत होता. शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेली मोफत पाठ पुस्तके यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वितरित केली. या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना मुख्याध्यापक इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसोबतच पालकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. शाळेत वर्षभरात घेण्यात येणार्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यासाठी त्यांना पालकांनी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें