सागवन येथील गुरुकुल ज्ञानपीठ येथे भाजपातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

BJP celebrates International Yoga Day at Gurukul Jnanpith in Sagarvan

बुलढाणा न्यूज

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत अनेक भारतीय आध्यात्मिक गुरूंनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी योगाचे महत्त्व ओळखून याचा जास्तीत जास्त लोकांनी अंगीकार करावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारताच्या या भूमिकेचे स्वागत करत संपूर्ण जगाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या माध्यमातून देश विदेशात योगाबद्दल व्यापक प्रचार प्रसार माहिती आदान प्रदान आणि विविध सामूहिक उपक्रम घेऊन या महत्त्वपूर्ण विषयाचा अंगीकार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत असते.

आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रत्येकानेच आपल्या जीवनात योग अंगीकारावा यासाठी बुलढाणा तालुक्यातील गुरुकुल ज्ञानपीठ सागवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

योग दिनानिमित्त एक दिवसीय योग शिबिराचा लाभ घेऊन एक निरोगी व शांतीपूर्ण आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी केला. योग दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय योग शिबिरास भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजीआमदार विजयराज शिंदे, गुरुकुल ज्ञानपीठचे संस्थापक डॉ.मधुसूदन सावळे, भाजपा तालुका अध्यक्ष सतीश भाकरे पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अ‍ॅड.मोहन पवार, गुरुकुल ज्ञानपीठच्या संचालिका सौ.सावळेताई, प्राचार्य मराठे सर, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हासचिव चंद्रकांत बर्दे, नगरसेवक सिंधुताई खेडेकर, तालुका उपाध्यक्ष सुरेश पाटील, राजेंद्र पवार, समाधान पाटील जाधव, नारायण निंभोरे, रामदास काकडे, राजेंद्र जाधव, माधव जाधव, शालिग्राम भोपळे, रामू पैठणे, ढवळे ताई, तज्ञ योग प्रशिक्षक भगवानराव सावळे, आयटीआय चे माजी प्राचार्य सावळे,घनश्याम बिबे, सागर पाटील ,नंता जाधव यांच्यासह गुरुकुल ज्ञानपीठचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग ईतर अनेक मान्यवर मंडळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें