Tremendous success of students of Swarvihar Music School, Buldhana
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई चा निकाल घोषित
बुलढाणा न्यूज
बुलढाणा
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबईचा संगीत विषयांच्या परीक्षांचा एप्रिल मे २०२५ या सत्राचा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये प्रारंभिक परीक्षेत शास्त्रीय गायन विषयात डॉ.विवेक इंगळे विशेष योग्यता श्रेणी, कु. पायल इंगळे विशेष योग्यता श्रेणी, सौ.शीला नाफडे प्रथम श्रेणी,शरद ठाकूर द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून सिंथेसायझर विषयात अद्वेत जाधव,यश इंगळे,स्वरूप चव्हाण, कु.शरण्या गवळी हे विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर प्रवेशिका प्रथम परीक्षेत गायन विषयात कु.समृद्धी जोशी,कु.हिंदवी चित्रंग,कुमारी मनस्वी पवार,सौ. कल्पना तायडे ह्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत तर प्रवेशिका पूर्ण गायन विषयात ज्योती खरे ह्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून मध्यमा प्रथम परीक्षेत गायन विषयात डॉ.मिलिंद जाधव,डॉ.रवींद्र गोफने, प्रसेनजीत मोरे हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून स्वरोम सराफ हा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.तबला विषयांमध्ये प्रारंभिक परीक्षेत जय मांटे,अथर्व गाळणे हे विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून आरव किन्होळकर,गजानन घिरके हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर प्रवेशिका प्रथम परीक्षेत सोहम नागरे हा विशेष योग्यता श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला असून प्रवेशिका पूर्ण परीक्षेत यथार्थ कणखर याने प्रथम श्रेणीत येण्याचा मानपटकाविला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून सदर विद्यार्थ्यांना स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा.रविकिरण मोरे व प्रा.अमोल दिशागज यांनी मार्गदर्शन केले आहे.