Yoga Day organized at Sant Nirankari Satsang Bhavan in Shegaon
बुलढाणा न्यूज टिम
शेगांव
संत निरंकारी मिशन मार्फत आंतराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून अवसर शनिवार, दि.२१ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजता भारतवर्षातील १००० पेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळी योग दिवस आयोजित केला जाणार आहे. मिशनच्या विविध शाखांमध्ये हे आयोजन स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या प्रांगणात किंवा उद्यानांमध्ये करण्यात येईल, ज्यामध्ये निरंकारी भक्तगण, सेवादल स्वयंसेवक व स्थानिक नागरिक उत्साहाने भाग घेतील.
स्थानिक स्तरावर संत निरंकारी सत्संग भवन शेगांव येथे योग दिवसाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये निरंकारी भक्तगणांसह इतर नागरिकांनीही सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष शेगोकार संयोजक जिल्हा बुलडाणा निरंकारी मिशनच्या स्थानिक प्रबंधकांकडून करण्यात आले आहे.
या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा विषय – एक पृथ्वी, एक स्वास्थ्य करिता योग असा जाहीर केला आहे. ज्यातून संपूर्ण मानवतेला हा संदेश मिळतो, की व्यक्तीचे वास्तविक स्वास्थ्य तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा ती शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक दृष्टीने संतुलित व जागरुक असेल. हाच उद्देश्य केंद्रीभूत मानून आपल्या आध्यात्मिक व सामाजिक प्रयत्नांच्या अंतर्गत योगाला समग्र कल्याणाचे माध्यम मानत निरंतर प्रयासरत आहे. संत निरंकारी मंडळाचे सचिव श्री.जोगिन्दर सुखीजाजी यांनी माहिती दिली, की २०१५ सालापासूनच संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन द्वारे योग दिवस नियमितपणे देशव्यापी स्तरावर आयोजित केला जात आहे. सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा या उपक्रमाचा सातत्याने विस्तार होत आहे सतगुरु माताजींचे हेच मार्गदर्शन आहे, की स्वस्थ मन, सहज जीवन त्यांच्या विचारांतून हे स्पष्ट होते, की मनुष्य तन ही ईश्वराची अनुपम देणगी आहे जी स्वस्थ आणि सशक्त बनवूनच मनुष्य आपल्या आध्यात्मिक व सामाजिक कर्तव्यांचा यथार्थ निर्वाह करु शकतो.
योग ही भारतातील एक प्राचीन विद्या आहे जी केवळ शरीरालाच बलवान बनवते असे नव्हे तर मनाला शांती देते आणि आत्म्याला जागृत करण्याची क्षमता बाळगते याचा नियमित अभ्यास करुन मनुष्य तनाव, असंतुलन आणि रोग इत्यादींपासून स्वत:चा बचाव करुन आत्मिक शांती व सामाजिक सौहार्दाच्या दिशेने अग्रेसर होतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अशा प्रकारच्या आयोजनाचा मूळ उद्देश हाच आहे, की आपण स्वत:च्या स्वास्थ्याला सर्वोच्च प्राथमिकता द्यावी आणि एक सुखद, संतुलित व शांतीपूर्ण जीवन जगण्याच्या दिशेने वळावे.