कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत योगेश सानपने मिळविले सिल्व्हर मेडल

योगेशला भारतातून दुसरा वेगवान धावपटू होण्याचा मान Yogesh has the distinction of becoming the second fastest runner from India.

बुलढाणा न्यूज

संपुर्ण सानप कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव
अंढेरा येथील एका खेड्यात गावातील रहिवासी असलेला योगेश जगन्नाथ सानप या नोकरी निमित्ताने पुणे येथे राहत असुन मागील सहा वर्षांपासून दररोज धावण्याचा सराव करत असायचा जगप्रसिद्ध असलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत भारतातून दुसरा धावपटू होण्याचा मान मिळवत सिल्व्हर मेडल जिंकले असुन योगेश सानप यांच्यावर आणि संपूर्ण सानप कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तो १२ जुनला दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतणार आहे.

मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथील रहिवासी असलेला योगेश जगन्नाथ सानप याने जगप्रसिद्ध असलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन अंतर ९० किलो मीटर असलेल्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका येथे दि ८ जुन २०२५ रोजी पार पडलेल्या पार पडली. ही स्पर्धा तब्बल ७ तास २६ मिनिटे ५८ सेकंदात पूर्ण करुन भारतातून दुसरा वेगवान धावपटू होण्याचा मान पटकवला.

अंढेरा येथील योगेश सानप यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत ९० किलोमीटर अंतर अवघ्या ७ तास २६ मिनिटे ५८ सेकंदात पूर्ण करत भारताला सिल्व्हर मेडल मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा योगेश सानप हा ९८ वर्षांत तिसरा भारतीय ठरला. ही स्पर्धा पीटरमैरिट्झबर्ग ते डर्बन या अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मार्गावर पार पडली.

कॉम्रेड मॅरेथॉनची वैशिष्ट्ये आणि आव्हाने

कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी (हे शंभरावे वर्ष परंतु ९८ वी स्पर्धा)आणि सर्वात मोठी अल्ट्रा-मॅरेथॉन स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेचे अंतर ८७ ते ९० किलोमीटर इतके असते आणि ते दक्षिण आफ्रिकेतील डोंगराळ, चढ-उतारांनी भरलेल्या आणि अतिशय खडतर मार्गावर धावावे लागते. या स्पर्धेत केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक क्षमतेचीही कसोटी लागते. या वर्षी २२००० हून जास्त जगभरातील धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धा पूर्ण करणे हेच मोठे यश मानले जाते. त्यामुळेच योगेश सानप यांची ही कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे. या स्पर्धेसाठी योगेश सानप हा मागील गेल्या सहा वर्षांपासून दररोज कठोर मेहनत घेत होता.यासाठी तो दररोज धावण्याचा सराव करायचा आणि आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर देशात कुठेही मॅरेथॉन स्पर्धेत अवार्जुन भाग घेत हमखास बक्षीस जिंकायचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें