बुलढाणा न्यूज टिम
शेतकरी, कष्टकर्यांच्या विविध मागण्यांसाठी संतनगरी शेगाव येथे शेतकर्यांचा एल्गार आयोजित करण्यात आला आहे. हा एल्गार दि.१० जून २०२५ रोजी श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर Farmer leader Ravikant Tupkar शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकर्यांच्या इतर मागण्यांसाठी एल्गार पुकारणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकर्यांनी या एल्गार मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकर्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर एल्गार पुकारला आहे. राज्यभरात ठीक ठिकाणी एल्गार मिळावे घेऊन शेतकर्यांना एकत्रित करून सरकारवर दबाव बनवण्याचे काम रविकांत तुपकर करीत आहेत. संपूर्ण कर्जमाफी तसेच शेतकर्यांचा हक्काचा पिकविमा तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावा, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरपाई तातडीने द्यावी, सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी, पिकांचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्या. सोयाबीनला आठ ते दहा आणि कापसाला १२ ते १४ हजार रुपये भाव मिळावा, या सह विविध मागण्यांसाठी शेतकर्यांचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत.
नाशिक, निफाड, सिन्नर, संगमनेर, अहिल्यानगर, शिक्रापूर, शिरूर, कर्जत, जामखेड, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड आदी जिल्ह्यांमध्ये दौरा करून रविकांत तुपकर यांनी दि.२७ मे रोजी सिंदखेड राजा येथे आयोजित एल्गार मेळाव्यात सरकारच्या विरोधात तोफ डागली होती.
त्यानंतर आता १० जून रोजी विदर्भ पंढरी, संतनगरी शेगाव येथे एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन येथे सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व ज्या शेतकर्यांना पीकविमा मिळाला नाही त्या शेतकर्यांनी आपल्या पावत्या घेऊन शेगाव येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने On behalf of the Revolutionary Farmers’ Organization करण्यात आले आहे.
Stampede case| चेंगराचेंगरीत प्रकरणाला नवे वळण; विराट कोहलीविरुध्द गुन्हा दाखल