अधिपरिचारिका ‘सपना’चे अनोखे ‘स्वप्न’…

The unique ‘dream’ of head nurse ‘Sapna’…

अवयव दानाचा फॉर्म भरून करा आपला वाढदिवस साजरा : अधिपरिचारिका सपना काकडे

सौ.साधना प्रवीण थोरात

बुलढाणा न्यूज

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा Serving the patient is serving God. हे ब्रीद वाक्य आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्वच व्यक्ती अंमलात आणत असतात. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी आपले सर्व आयुष्य रुग्णाच्या सेवेसाठी अर्पण केले आहे. इ.स.१८५३ साली झालेल्या युद्धामध्ये जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली होती. फ्लोरंस नाईटअ‍ॅन्गल यांच्या कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये अधिपरिचारिका  superintendent यांनी केलेले सेवेचे योगदान अधोरेखित केले आहे. जन्मदिवस प्रत्येकाचा दरवर्षीच होतो पण यामध्ये केक कापणे, महागड्या हॉटेलमध्ये जेवण करणे, कपडे घेणे यापेक्षा वेगळे काही होत नाही.

         ..पण काही जन्मदिवस हे इतरांपेक्षा वेगळे असतात, समाजाचे काही देणे असते हि भावना काहीना मुळातच स्वस्थ बसू देत नाही. ग्रामीण रुग्णालय देऊळगाव मही येथे कार्यरत असणार्‍या सपना उत्तमराव काकडे ह्या अधिपरिचारिका या पदावर काम करीत असतांना त्यांना जाणवले कि या वेळेसचा जन्मदिन आपण गोर-गरीब ,बेघर, बेसहारा, मनोरुग्ण यांच्या सोबत साजरा करावा म्हणूनच त्यांनी दिनांक ३०/०५/२०२५ रोजी आपला जन्मदिवस वरवंड येथील दिव्य सेवा प्रकल्प मध्ये साजरा केला. समाजामध्ये आज अनेक अंध व्यक्ती आहेत कि ते सुंदर असे जग डोळे नसल्यामुळे पाहू शकत नाही, काही रुग्णांचे फुफुस खराब झाल्याने अवेळी मृत्यू येतो. तर काहीचे हृदय खराब झाल्याने मृत्यू होतो. आपल्या मृत्यू नंतर आपले सर्व अवयव जळून जातात. पण त्याच अवयवाचा उपयोग आपण आपल्या मृत्युनंतर अवयव दान केले तर ते इतरांच्या कामी येईल आणि आपण त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा हे जग पाहू शकतो. ही भावना मनाशी ठेवून ग्रामीण रुग्णालय देऊळगाव मही Rural Hospital Deulgaon Mahi येथे कार्यरत असणार्‍या अधिपरिचारिका सपना उत्तमराव काकडे यांनी रुग्णाला उपयोगी येणारे योग्य ते अवयवदान देण्याचा संकल्प आई-वडिलांच्या साक्षीने सदरहू अवयव दानाचा फॉर्म भरून केला. मरावे परी कीर्ती रुपी उरावे या त्यांच्या संकल्पनेने व अधिपरिचारिका म्हणून खर्‍या अर्थाने कृतीशील कार्य केल्याने त्यांचे कौतुक करावे तितके कमीच. समाजातील व्यक्तींनी सुद्धा आपले जन्मदिवस अश्या प्रकारे साजरे केल्यास समाजाला त्याचा खूप फायदा होईल असे आवाहन सुद्धा सपना काकडे Sapana kakade यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें