उबाठा शिवसेनेचे मलकापूर आगार प्रमुख मुकुंद न्हावकर यांना निवेदन

Ubatha Shiv Sena’s Malkapur depot chief Mukund Nhavkar’s statement

तळणी ग्रामपंचायतचा ठराव देवून मलकापूर तळणी बससेवा सुरु करावी

Malkapur-Talni bus service should be started by passing a resolution from Talni Gram Panchayat.

बुलढाणा न्यूज टिम मलकापूर

मलकापूर ते तळणी नियमित बससेवा सुरू करण्यासाठी मलकापूर आगार प्रमुख मुकुंद न्हावकर Malkapur depot head Mukund Nhavkar यांना तळणी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन निवेदन देण्यात आले. तळणी येथील शाळकरी विद्यार्थी -विद्यार्थीनी तसेच दवाखान्यानिमित्त जाणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत. सकाळची नियमित बससेवा मलकापूर ते तळणी बस नसल्याने विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी जाण्यास उशीर होत आहे.

तळणी येथील विद्यार्थ्यांना क्लासेसाठी तळणी ते दाताळा, मलकापूर येथे ये-जा करण्यासाठी शेलापूर पर्यंत पायी जावे लागते. तसेच ऐन लग्नसराईत सुध्दा तळणी ग्रामस्थांना शेलापूर पर्यंत पायी ये जा करावी लागते. परिणामी गावातील नागरिकांना खाजगी वाहनाने जादा भाडे देऊन ये-जा करावी लागत आहे. यामुळे तळणी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

तरी सव्वा आठ वाजेची माकोडी ते मलकापूर येणारी बस वापस पिंप्रीगवळी पर्यत जाते. ही बस पिंप्रीगवळी वरून येतांना तळणीमार्गे पाठवण्यात यावी किंवा सकाळीची तळणी ते मलकापूर येणारी बस नियमित पाठवण्यात यावी अशी मागणी आगार प्रमुखांकडे तळणी ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायतचा ठराव घेऊन करण्यात आली आहे.

ह्यांची होती निवेदन देतेवेळी उपस्थिती
मलकापूर उबाठा तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील, पत्रकार गणेश वाघ, संजय नारखेडे, राजेंद्र काजळे, गणेश सुशीर, साहिल रायपुरे, ऋषिकेश खराटे, महेश रायपुरे, अनिल खराटे, ऋषिकेश जोशी, स्वप्नील बोंडे, सुपडा गावंडे, नामदेव नाफडे, प्रतिक वराडे, सुरेश पवार, गणेश उंबरकर, बाबुराव निकम, स्वप्नील बर्‍हाटे यांच्यासह तळणी येथील ग्रामस्थ, विद्यार्थी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें