CIBIL score during lockdown should not be accepted: Prabhakar Waghmare’s demand
लॉकडाऊन काळातील सिबिल स्कोर ग्राह्य धरू नये : प्रभाकर वाघमारे यांची मागणी
बुलढाणा न्यूज
लॉकडाऊन काळ संपल्यानंतर ज्यांनी कर्ज भरलेले आहे किंवा थोडाफार उशीर झाला आहे. अशा ग्राहकांचा सिबिल येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील सिबिल स्कोर ग्राह्यधरू नये, अशी मागणी युवा पुरस्कार प्राप्त प्रभाकर वाघमारे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्यांमार्फत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यामध्ये कोविड विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन होते. त्या काळात अनेक छोट्या व्यावसायिकांनी कर्ज काढून उपजीविका भागवण्यासाठी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले होते. परंतु, लॉकडाऊन काळात सर्वत्र कडेकोट बंद झाले होते. परंतु, काही खाजगी बँक फायनान्स व बँकेचा दर्जा असलेल्या संस्थानी तीन महिने उशीर जरी झाला तरी ते खाते एनपीएमध्ये गेल्याची नोंद करुन अनेक कर्जदारांच्या सिबिल स्कोरवर तशी नोंद केली आहे त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका त्यांना आता कर्ज देण्यास टाळटाळ करीत आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी लॉकडाऊन संपल्यावर किंवा ज्यांचा थोडाफार उशीर झालेला आहे. परंतु, संपूर्ण कर्ज आज निल केले
आहे, अशा नागरिकांचे लॉकडाऊन काळामधील सिबिल स्कोरची नोंद ग्राह्य धरण्यात येऊ नये. तसे निदर्शे आपण राज्यामध्ये राबवावे जेणे करून नागरिकांना नाहक त्रास होणार नाही व नागरिक खाजगी फायनान्सकडे वळून अव्वाच्या-सव्या व्याजदराला बळी पडणार नाहीत, अशी मागणीही प्रभाकर वाघमारे यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
त्यामुळे शासनाने यांची गंभीर दखल घेवून यावर निर्णय घ्यावा कारण अनेक छोटे मोठे उद्योजक यामध्ये भरडले जात आहे. तरी यासंदर्भात लवकरात लवकर मंत्रीमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेवून न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. कारण यामुळे अनेकांना अडथळा निर्माण झाला आहे.