जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुलढाण्यात सायकल रॅलीचे आयोजन

Cycle rally organized in Buldhana on the occasion of World Environment Day

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुलढाण्यात सायकल रॅलीचे आयोजन
प्रदीप डांगे/ बुलढाणा न्यूज टिम
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील भव्य सायकल रॅलीचे आयोजन दि.५ जून २०२५ रोजी केले आहे. ही रॅली गांधी भवन जयस्तंभ चौक, बुलढाणा येथून सकाळी सात वाजता काढण्यात येणार आहे.

तसेच बुलढाण्यातील पर्यावरण मित्र मंडळींनी जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी ही मोहिम राबवून ज्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या घरी जाऊन बुलढाणा शहर व परिसरामध्ये तब्बल ३५ हजारापेक्षा अधिक रोपांची लागवड केले आहे. विशेष म्हणजे हे ह्या वृक्षांचे नुसतेच रोपण करुन हे पर्यावरण मित्र थांबले नसून लागवड करण्यात आलेल्या रोपांचे संवर्धन देखील त्यांच्यामाध्यमातून करण्यात आले आहे हे विशेष…!

तरी आपण सर्व पर्यावरण मित्रांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुरुवार, दि.५ जून २०२५ रोजी गांधी भवन, जयस्तंभ चौक, बुलढाणा येथे सकाळी ७ वाजता आवजून उपस्थित रहावे असे आवाहन, बुलढाणा पर्यावरण मित्र Buldhana Environmental Friends मंडळांने केले आहे. याबाबत जिल्हास्तरीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना देखील प्रत्यक्ष जावून निमंत्रण देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें