शेगांव शहर पोलीसांची उत्तम कामगिरी अल्पवयीन मुलीला पळवुन नेणार्‍यास काहीतासातच अटक

Excellent performance by Shegaon city police
The person who kidnapped a minor girl was arrested within hours

शेगांव शहर पोलीसांची उत्तम कामगिरी
अल्पवयीन मुलीला पळवुन नेणार्‍यास काहीतासातच अटक

शेगाव
अल्पवयीन मुलीला पळवुन नेणार्‍यास शनिवार, दि.३१/०५/२०२५ रोजी शेगांव पोलीसांनी काहीच तासात अटक केली आहे. यामुळे शेगांव शहर पोलीसांचे कौतुक होते. या घटनेतील आरोपीला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवार, दिनांक ३१ मे २०२५ रोजी फिर्यादी अवचार यांने माहिती दिली की, ते त्यांचे पत्नीसह झोपलेले होेते. या दरम्यान पत्नीला जाग आल्यानंतर त्यांना त्यांची तीन वर्षीय मुलगी दिसुन आली नाही. तसेच त्यांनी मुलीचा आजु बाजुचे परिसरात शोध घेतला असता ती आढळून आली नाही. मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेल्याबाबत रिपोर्ट दिल्याने शेगांव शहर पोलीसांनी या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करुन तपास करण्यात आल.

या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता शेगांव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील Police Inspector Nitin Patil, Thanedar of Shegaon City Police Station यांना या बाबत वरीष्ठांना माहीती देऊन विलंब न लावता अल्पवयीन मुलीला व आरोपीला शोधण्यासाठी विविध तीन पोलीस पथके गठीत केले. त्यांना सुचना देऊन पो.स्टे. हद्दीत रवाना केले. सदर पथकाव्दारे पो.स्टे. हद्दीतील सिसीटीव्हीचे फुटेज, गोपनीय बातमीदार तसेच प्रतिष्ठीत नागरीक पवन शर्मा, रविश पाडलीवाल, विकी कलोरे व शंकर बुरुंगे (सुरक्षा रक्षक) यांनी शेवटपर्यंत सोबत राहुन अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी मदत केली आहे. त्यांची तपासात मध्यरात्री पोलीसांना मदतीचा हात देऊन त्यांचे खाजगी सिसीटीव्हीचे फुटेज दाखविल्याने आरोपीची येण्या जाण्याचा मार्ग दाखविल्याने आरोपीची दिशा समजून आली. त्या बातमीदारांचे मदतीने आरोपीचा शेगांव येथील आठवडी बाजार परिसरात शोध घेतला व अवघ्या चार तासाचे आत तपास चक्रे फिरवून अल्वयीन तीन वर्षीय मुलीला पळवुन नेणारा आरोपी योगेश लक्ष्मण डाबेराव (वय २१) रा.बहादुरा ता. बाळापुर जि. अकोला यास शेगांव आठवडी बाजार परिसरातुन अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपी सध्या शेगाव शहर पोलीसांचे ताब्यात असुन त्यास विचारपुस सुरु आहे.

अल्पवयीन मुलीला सुखरुप तिचे पालकांचे ताब्यात दिले आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगांव प्रदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शेगांव शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचे प्रत्यक्ष सहभागात तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक कुणाल जाधव यांनी व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.हे.कॉ. गजानन वाघमारे, पो.हे.कॉ. संजय करुटले, पो.हे.कॉ.संतोष गवई, पो.हे.कॉ. गणेश वाकेकर, पो.कॉ.जितेंद्र झाडोकार, पो.कॉ. प्रकाश गव्हांदे, पो.कॉ. किशोर साबे, चालक पो.हे.कॉ. योगेश सुरोशे यांनी केली आहे.

 

पोलीस अधिक्षक बुलढाणा श्री.निलेश तांबे साहेब यांनी सर्व नागरीकांना याव्दारे आवाहन केले आहे की, जनतेने पोलीसांसोबत समन्वय राखुन त्यांना अशा स्वरुपाच्या किंवा ईतर गुन्ह्यांमध्ये अशाच प्रकारे सहकार्य करुन समाजातील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करुन गुन्हेगारी वृत्तीला आळा बसविण्यासाठी सदैव तत्पर रहावे व मदत करावी. नागरीकांनी केलेल्या मदतीमुळेच पिडीतांना न्याय देणे पोलीस व न्याय व्यवस्थेला सोयीस्कर होईल.

– नितीन पाटील, पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार
पोलीस स्टेशन शेगांव शहर जि. बलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें