सहकार विद्या मंदिरच्या उन्हाळी क्रीडा शिबीराची सांगता

Conclusion of Sahakar Vidya Mandir’s summer sports camp

बुलढाणा न्यूज
येथील Summer sports camp at Sahakar Vidya Mandir सहकार विद्या मंदिरमध्ये उन्हाळी क्रीडा शिबीराची शनिवार, दि.३ मे, २०२५ रोजी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. सदर शिबीरास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या क्रीडा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांंना विविध क्रीडा प्रकारांचे अनुभवी प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले होते. यामध्ये स्विमिंग, स्केटिंग, जिमनास्टीक्स, क्रिकेट, बास्केटबॉल, डान्स व साहसी क्रीडा प्रकार वॉल क्ल्यांबिग व क्रॉसिंग याप्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसह त्यांच्या अंगीभुत कलागुणांना वाव देण्याचे कार्य सदैव शालेय प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येते. मानसिक क्षमतेसोबतच त्यांची शारीरिक क्षमता उत्तम असणे आजच्या काळात गरजेचे आहे. दि.१५ एप्रिल २०२५ ते दि.३ मे, २०२५ पर्यंत दुपारी ४ ते ७ या वेळेत सदर शिबीर होते. सदर शिबीराच्या समारोप प्रसंगी बुलडाणा अर्बन चॅरीटेबलच्या अध्यक्षा सौ.कोमलताई सुकेश झंवर Mrs. Komaltai Sukesh Jhanwar यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचा उत्साह व साहसी क्रीडा प्रशिक्षणाचे मान्यवरांनी कौतुक केले. सहकार विद्या मंदिरच्या उन्हाळी क्रीडा शिबीराच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, शालेय क्रीडा प्रशिक्षक याच्यासह सर्व कर्मचारी वर्गाने अथक परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें