रोजगार हमी सचिवांनी कोणाला दिला शब्द

To whom did the Employment Guarantee Secretary give his word?

तासभर बैठकीनंतर सरकारकडून सकारात्मक आश्वासन
बुलढाणा न्यूज टिम
मेहकर
मेहकर-लोणार मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नशेत रस्ते अखेर शासन दरबारी ठामपणे मांडण्यात आले. मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज गुरुवार, दि.२९ मे २०२५ रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे सचिव यांची भेट घेऊन शेत रस्त्यांसाठी भरघोस निधीची मागणी केली.

या बैठकीत मेहकर विधानसभेचे आमदार सिध्दार्थ खरात यांनी मतदारसंघातील रस्ते, पाण्याचे अडथळे व विक्री व्यवस्थेतील अडचणी याविषयी ठाम मुद्दे मांडले. या चर्चेनंतर सचिवांनी आश्वासन दिले की, तुम्ही मागाल तेवढा निधी देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू..!

या महत्वाच्या बैठकीस मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती सागर पाटील, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक सचिव प्रदीप बिल्होरे पाटील हे उपस्थित होते. या पुढाकारामुळे मतदार संघातील अनेक गावांना चकाचक शेत रस्त्यांची नवी सौगात मिळणार आहे! शेतकर्‍यांच्या हितासाठी लढणारा नेता म्हणून सिद्धार्थ खरात यांची प्रतिमा आणखी बळकट होत आहे, अशी जोरदार चर्चा सध्या संपूर्ण मतदारसंघात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें