MNS leader Amol Rindhe’s demand achieved in eight days…
पीक कर्ज मदतीसाठी शेतकरी सहाय्यता केंद्र तर बँकांवर कारवाईचे बुलढाणा जिल्हाधिकार्यांचे आदेश
बुलढाणा न्यूज
शेतकर्यांच्या पीक कर्जांना तात्काळ मंजूरी द्यावी तसेच पीक कर्ज वाटप करण्यात दिरंगाई करणार्या बँकांवर फौजदारी दाखल करावी, या मागणीचे निवेदन बुधवार, दि.२१ मे २०२५ रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे Buldhana MNS Taluka President Amol Rindhe यांनी केले होते. बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी निवेदनात केलेल्या मागणीनुसार पिक कर्ज मदतीसाठी शेतकरी सहायता केंद्र तर कर्तव्यात दिरंगाई करणार्या बँकांवर फौजदारी दाखल करणार असल्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी २७ मे रोजी जारी केल्याने मनसे नेते अमोल रिंढे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. अमोल रिंढे पाटील सातत्याने शेतकर्यांना पीक कर्ज मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. त्यांच्या मागणीला यश आल्याने आता पिक कर्ज मंजुरी होण्यामध्ये सुलभता येणार आहे. त्यांच्या ह्या मागणीला यश आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य शेतकर्यांनी अमोल रिंढे पाटील यांचे आभार मानले.
जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी बँकांना काय दिले निर्देश ?
- शेतकर्यांना कर्ज वितरणास सुलभता तसेच त्यांचे अडचणीचे निराकरण व्हावे.
- सर्व शासकीय, खाजगी बँक व ग्रामीण बँकांनी शेतकरी सहाय्यता केंद्र सुरु करावे.
- शेतकर्यांच्या कुठल्याही शासकीय मदतीला व पीक विमाच्या रकमेला होल्ड लावू नये, वा त्यातून कुठल्याही प्रकारची कर्ज वसूली करू नये.
- या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित शाखा व्यवस्थापकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
- बँकेत येणार्या प्रत्येक ग्राहकास सौहार्द व सन्मानाची वागणूक देण्यात यावी.
बुलढाणा जिल्हयातील बँक समन्वयकांचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे
- बँक ऑफ बडोदाचे समन्वयक के.पी.शर्मा (९६८७६०६०७९)
- बँक ऑफ इंडिया समन्वयक बधिनाथ घुगे (९७६३०००८७५०)
- बँक ऑफ महाराष्ट्रचे समन्वयक चेतन वानखडे (९०२८८९५२२४)
- कॅनरा बँक चे समन्वयक संजय कडवे (९४७९०३४४९८)
- सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे समन्वयक अमोल तायडे (९८९०८९९४८६)
- इंडियन बँकचे समन्वयक संदीप काळे (८७९९९५३३१०)
- इंडियन ओव्हरसीज बँकचे राहूल शेंबेकर (७६२०७६२७२७)
- पंजाब नॅशनल बँकचे समन्वयक सुयोग नेमाने (९९७०४७००८६)
- स्टेट बँक ऑफ इंडियाचे समन्वयक हेमंत (७७१९९७९३९३)
- युको बँकचे समन्वयक रविराज सातव (८०८७६३७४७७)
- युनियन बँक ऑफ इंडियाचे समन्वयक रवी चोपडे (६३०१९१६०४०)
- अक्सीस बँकचे समन्वयक रमेश खेडकर (९७३००७६९२६)
- एचडीएफसी बँकचे समन्वयक संकेत (९९६०८९६९८९)
- आयसीआयसी बँकचे समन्वयक समर चव्हाण (९८९०५१३५२३)
- आयडीबीआय बँकचे समन्वयक राजेश मंडन (९४०४८२५१०३)
- व्हीकेजीबीचे समन्वयक अविनाश महाले (९४२३७६११९६)
- बीडीसीसीचे समन्वयक डॉ. अशोक खरात (७३५०७३२१७९)
- इक्विटस स्मॉल फायनान्स बँकचे समन्वयक संदिल धुमाळ (८८३०५३८४१३)
- बंधन बँकचे समन्वयक मयूर आमोदकर (७०४४४१२७७९)
- कोटक महिंद्रा बँकचे समन्वयक आकाश पंजानी (९५४५८६१५१६) यांच्याशी संपर्क साधावा.
विचारांवर निष्ठा ठेवून काम करणे म्हणजेच योगाभ्यास : सुरेखा खोत
१०० पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळेसाठी ३ अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण होणार
करदात्यांनो लक्ष द्या! आयटीआरची मुदत वाढवून १५ सप्टेंबर २०२५ केली आहे