Ramai Ambedkar Memorial Day celebrated at Nalanda Library
बुलडाणा सुंदरखेड नागसेन नगर येथील नालंदा सार्वजनिक वाचनालय विजयनगर, बुलढाणा येथे मंगळवार, दिनांक २७ मे २०२५ ला सायंकाळी सात वाजता रमाबाई आंबेडकरांच्या ९० व्या स्मृती दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात सेवानिवृत्तशिक्षीका प्रधान मॅडम यांनी रमाबाईंच्या प्रतिमेस पूजन हार अर्पण केला. याप्रसंगी उपस्थितीतानी देखील रमाबाईंच्या प्रतिमेस पुष्पअर्पण केले. बुध्द वंदना घेवून व दोन मिनिटे श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमास आशाताई नामदेवराव वानखडे, संध्याताई हिवाळे, पी.आर.गवई, एस.जी.रोकडे, एन.आर.(नामदेवराव) वानखडे, संदीप वानखडे, गौरव खरे, मनिष ढवळे आदी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस.जी.रोकडे यांनी केले.