अरे बाप रे… मलकापूरात उद्या गाढव मोर्चा

Oh my god… donkey march tomorrow in Malkapur

मलकापूर

मलकापूर शहरातील विविध सुविधांच्या मुद्यावर कॉग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवार, दि.२९ मे २०२५ रोजी Donkey march on Malkapur Municipality मलकापूर नगर पालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात येणार आहे. Former MLA Rajesh Ekde माजी आमदार राजेश एकडे, डॉ.अरविंद कोलते, अ‍ॅड.साहेबराव मोरे यांच्या मार्गदर्शनात व माजी नगराध्यक्ष हाजी रशीदखाँ जमादार, श्याम राठी, अ‍ॅड.हरीश रावळ व शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मलकापूर शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.

मलकापूर Malkapur प्रशासनाचा बेलगाम कारभारामुळे शहरातील नाल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे दररोज रस्त्यांची स्वच्छता होत नाही, नित्य कचरा संकलन होत नाही, पूर्णा नदीला मुबलक पाणी असूनही पंधरा दिवसांनी देखील पाणी पुरवठा होत नाही याचबरोबर पथदिवे व हायमास्ट लाईट्स बंद असतात. त्यामुळे सर्वसामान्य मलकापूरकरांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांबाबत मलकापूर नगर पालिका प्रशासनाला मंगळवार, दि.६ मे २०२५ रोजी निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप मलकापूर शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

त्यामुळे मलकापूर करांनी गुरुवार दुपारी बारा वाजता श्री हुतात्मा स्मारक ते नगर पालीका कार्यालयापर्यंत गाढव मोर्चा काढून नगर पालिकेत कचरा फेको व मडके फोडो आंदोलन करण्यात येणार आहे, तरी या मोर्चात मलकापूर करांनी सहभागी होवून नगर पालीका प्रशासनास वठणीवर आणावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें