Attention Taxpayers! ITR Market Launched on 15th September 2025
करदात्यांनो लक्ष द्या! आयटीआरची मुदत वाढवून १५ सप्टेंबर २०२५ केली आहे
कर भरण्याची प्रक्रिया सुलभ
आयकर विभागाने मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियावर ही माहिती जाहीर केली आहे की, करदात्यांनो लक्ष द्या! सीबीडीटीने ३१ जुलै २०२५ पर्यंत भरण्यासाठी असलेल्या आयटीआरची मुदत वाढवून १५ सप्टेंबर २०२५ केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) साठी आयकर परतावा (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे.
यापूर्वी ३१ जुलै २०२५ असलेली मुदत आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने सांगितले की, Major changes have been made in the ITR form. आयटीआर फॉर्ममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, सिस्टम अपडेट करणे आणि टीडीएस क्रेडिट्स योग्यरित्या दिसण्यासाठी आवश्यक तांत्रिक काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत आहे. विभागाने म्हटले, या मुदतवाढीमुळे करदात्यांना नवीन फॉर्म समजून घेण्यासाठी, सिस्टम डेव्हलपमेंट आणि टीडीएस क्रेडिट्स योग्यरित्या दाखवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. यामुळे करदात्यांना सुलभ आणि अचूक रिटर्न भरण्याचा अनुभव मिळेल.
यासंदर्भातील औपचारिक अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.सीबीडीटीने स्पष्ट केले की, मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी New ITR form नवीन आयटीआर फॉर्ममध्ये संरचनात्मक आणि सामग्रीशी संबंधित महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. हे बदल कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, पारदर्शिता वाढवण्यासाठी आणि माहिती अचूक नोंदवण्यासाठी केले गेले आहेत. या बदलांमुळे सिस्टम डेव्हलपमेंट, एकीकरण आणि संबंधित युटिलिटीजच्या चाचणीसाठी अतिरिक्त वेळ लागत आहे. या शिवाय, शनिवार, दि.३१ मे २०२५ पर्यंत दाखल होणार्या टीडीएस स्टेटमेंटमधील क्रेडिट्स जूनच्या सुरुवातीला दिसू लागतील. जर मुदतवाढ दिली गेली नसती, तर रिटर्न भरण्याची प्रभावी कालमर्यादा खूपच कमी राहिली असती.सीबीडीटीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी अधिसूचित आयटीआर फॉर्ममध्ये संरचनात्मक आणि सामग्रीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करणे, पारदर्शिता वाढवणे आणि माहिती अचूक नोंदवणे हे या बदलांचे उद्दिष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.