टंकलेखकांच्या ५ हजार २२३ नवीन पदांची निर्मिती

Creation of 5,223 new posts of typists

टंकलेखकांच्या ५ हजार २२३ नवीन पदांची निर्मिती

बुलढाणा न्यूज
मुंबई – राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकार्‍यासाठी एक टंकलेखक A typist for a judicial officer यानुसार ५ हजार २२३ टंकलेखकाची एकाकी पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

महाराष्ट्र राज्यात District Judge, Civil Judge (Senior Level), Civil Judge (Junior Level)  जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) या संवर्गातील अधिकार्‍यांची नवीन २ हजार ८६३ नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत.

यापूर्वीची २ हजार ३६० पदे मंजूर आहेत. त्यामुळे राज्यात सध्या न्यायिक अधिकार्‍यांची ५ हजार २२३ पदे मंजूर आहेत. या सर्व अधिकार्‍यांना वरील निर्णयानुसार एक टंकलेखक दिला जाणार आहे. याबाबत Shetty Commission शेट्टी आयोगाने न्यायिक अधिकार्‍यांसाठी टंकलेखक दिला जावा अशी शिफारस केली आहे. या सर्व टंकलेखकांच्या वेतनापोटी For the sake of typists’ salaries येणार्‍या १९७ कोटी ५५ लाख, ४७ हजार, ५२० रूपयांच्या वार्षिक खर्चासही आज मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें