गाळेधारकांना बसस्टॅन्ड समोरील तीनशे प्लॉट वाटप करण्यात येणार- आ.सिध्दार्थ खरात

Three hundred plots in front of the bus stand will be allotted to the landowners – Siddharth Kharat

सहा महिन्याच्या कारकिर्दीत केलेल्या कामाचा लेखाजोखा; १९८९ पासूनचे अतिक्रमण काढण्यात यश आल्याचे सुतोवाच

मेहकर शहरातील अतिक्रमण काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे जे गाळा धारक त्याठिकाणी रस्त्यावर आले. त्यासर्व गाळेधारकांना बसस्टॅन्ड समोरील तीनशे प्लॉटची वाटप करण्यात येणार असून लवकरात लवकर याबाबतची गाळाधारक गाळा वाटप वितरणाचे कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतची निविदा अंतिम स्तरावर असून त्याबाबतचा निर्णय लवकरच होणार असल्याचे खरात यांनी सांगितले.

बुलढाणा न्यूज / मेहकर

आमदार सिद्धार्थ खरात MLA Siddharth Kharat यांनी मेहकर विधानसभा मतदार संघातील मागील सहा महिन्याचा यशस्वी आराखडा पत्रकार परिषदेत मांडला आज दिनांक २६ मे २०२५ रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन सहा महिन्याच्या कारकिर्दीत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. प्रामुख्याने मेहकर शहरातील एमआयडीसी तिल अतिक्रमन हटवण्यात आले.

सिद्धार्थ खरात यांनी निवडणूक काळात याबाबत एमआयडीसी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने खरात यांनी एमआयडीसी व उद्योग विभाग तसेच महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा केला व १९८९ पासून जे अतिक्रमण झाले होते ते अतिक्रमण काढण्यात त्यांना यश मिळवले आहे. या ठिकाणी आता १५ एमआयडीसीचे प्लॉट उपलब्ध झाले असून लवकरच त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. व ज्यांना या ठिकाणी उद्योग व्यवसाय करायचे आहे त्यांच्यासाठी आता हा मार्ग मोकळा झाला आहे.

खरात पुढे बोलताना असे म्हणाले की ५३ एकर जागेमध्ये एमआयडीसी च्या गरजा पूर्ण होणार नाहीत म्हणून अतिरिक्त ५०० एकर ची जागा एमआयडीसी ने महसूल प्रशासनाकडे मागितलेली आहे. महसूल विभागाकडून याबाबत आढावा घेण्यात येत असून कमीत कमी दोनशे एकर जागा शासकीय अथवा खाजगी स्वरूपातली जागा भूसंपादन करून देण्याचे आश्वासन आमदार महोदयांना दिल्याचे त्यांनी सांगितले असे झाले तर एमआयडीसीचा जो मार्ग आहे तो अधिक प्रशस्त होईल असा विश्वास खरात यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मेहकर शहरात तिल अतिक्रमण काढून टाकण्यात आले व त्यामुळे जे गाळा धारक त्या ठिकाणी रस्त्यावर आले त्या सर्व गाळेधारकांना बसस्टॅन्ड समोरील तीनशे प्लॉटची वाटप करण्यात येणार असून लवकरात लवकर याबाबतची गाळाधारक गाळा वाटप वितरणाचे कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे त्याांनी सांगितले. याबाबतची निविदा अंतिम स्तरावर असून त्याबाबतचा निर्णय लवकरच होणार असल्याचे खरात यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत Press conference उपजिल्हा प्रमुख प्रा आशिष रहाटे, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, युवा सेना तालुका अध्यक्ष अ‍ॅड.आकाश घोडे, सर्कल प्रमुख साहेबराव हिवाळे, अ‍ॅड.संदीप गवई, पंडित बापू देशमुख,उपसरपंच गजानन राठोड,गणेश सवडतकर, विजय मोरे, जीवन घायाळ, स्वप्नील हाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें