विचारांवर निष्ठा ठेवून काम करणे म्हणजेच योगाभ्यास : सुरेखा खोत

Working with faith in one’s thoughts is the practice of yoga: Surekha Khot

योगांजलीच्या योग शिबीराचे उद्घाटन Inauguration of Yoganjali’s yoga camp

बुलढाणा न्यूज/ मलकापूर

अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहून एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करणे म्हणजेच योगाभ्यास असल्याचे मत सुरेखा खोत यांनी योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. पैसा कशासाठी कमवायचा असतो तर सुख मिळण्यासाठी पैसा कमवायचा असतो. पण पैशाने खरेच सुख मिळते काय? सुख मिळण्यासाठी शरीर आणि मन हे सुदृढ असावे लागते. त्यासाठी पैशाची फारशी आवश्यकता नसते. म्हणूनच सुख ,मन:शांती व चांगले जीवन मिळावे यासाठी योगावर निष्ठा ठेवून त्याचा दररोज सराव केला तर निश्चितच आनंददायी जीवन जगता येईल असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने योगांजली योग वर्गाच्या वतीने महिलांसाठी नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन अजिंक्य वैभव मंगल कार्यालयात करण्यात आले.

या शिबीराचे उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविकात अंजली परांजपे यांनी महिलांनी आपल्या सुदृढ निरोगी आयुष्यासाठी या योग वर्गात सहभागी होऊन कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सातत्याने प्रयत्न करावे असे सांगीतले. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सुरेखा खोत यांनी करून उद्घाटन केले.

याप्रसंगी योगपीठावर शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नूतन चव्हाण, अरूणा महाजन, योग वर्गाच्या समन्वयक गीता नागपुरे यांची उपस्थिती होती. या योग वर्गात परिसरातील महिला योगसाधिकांनी उत्साहाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें