क्षमतेपेक्षा जास्तीच्या प्रवेशास परवानगी देवू नका; विजुक्टाचे शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन

भौतिक सुविधांचा अभाव
मागील काही वर्षांपासून बर्‍याच महाविद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव व संसाधनांची कमतरता असतांना देखील क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जात आहेत. यातील बरीच महाविद्यालये नियम व अटी धाब्यावर बसवत अमर्याद विद्यार्थी प्रवेशित करून घेतात.

Do not allow admission beyond capacity; Vijukta’s statement to education authorities

बुलढाणा न्यूज/ मलकापूर

यंदाच्या वर्षी पासून महाराष्ट्र शासनाकडून वर्ग अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया  Online admission process for class 11th राबविण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महाविद्यालयाला संसाधने व भौतिक सुविधेनुसार प्रवेश मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश पुर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांना क्षमतेपेक्षा अधीक प्रवेश देण्याची परवानगी देण्यात येवू नये अशा आशयाचे निवेदन विजुक्टा अर्थात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, मलकापूर तालुका संघटनेच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांना सोमवार, दि.२६ मे २०२५ रोजी देण्यात आले.

विजूक्टा मलकापूरचे तालुकाध्यक्ष प्रा.अनंत टेकाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ग ११ वी प्रवेशासाठी शासनाने जे निकष व प्रवेश मर्यादा ठरवून दिलेले आहेत त्यानुसारच प्रवेश देण्यात यावे. कारण मागील काही वर्षांपासून बर्‍याच महाविद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव व संसाधनांची कमतरता असतांना देखील क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जात आहेत. यातील बरीच महाविद्यालये नियम व अटी धाब्यावर बसवत अमर्याद विद्यार्थी प्रवेशित करून घेतात. त्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी शहरी भागातील महाविद्यालये ओस पडून तेथील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवेदनाद्वारे आम्ही शासनाकडे अशी मागणी करत आहोत की, जोपर्यंत सर्व शाखांच्या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला अतिरिक्त विद्यार्थी संख्या प्रवेशित करण्याची परवानगी मिळू नये. याबाबत शिक्षण विभाग व शासनाच्या वतीने योग्यते नियोजन करावे. निवेदन देतेवेळी संंघटणेचे पदाधिकारी व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते यात प्रा. एस.के शेंडे, प्रा. सुधाकर इंगळे, प्रा.अरूण बरडे, प्रा डॉ नितीन भुजबळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें