Supply of 600 bags of fertilizer to Ruikhed Tekale based on the concept of Sandipdada Shelke, the creator of One Buldana Mission
बुलढाणा न्यूज
District Coordinator of Shiv Sena (Ubatha) Party शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष आणि वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदिपदादा शेळके Sandip Dada Shelke, the founder of One Buldhana Mission यांच्या संकल्पनेतून सलग पाचव्या वर्षी शेतकर्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्यात आला. तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथे २४ मे रोजी ६०० बॅग खत उपलब्ध करीत पेरणी महोत्सवाला सुरुवात झाली.
गेल्या पाच वर्षांपासून शेतकर्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसात शेतकर्यांची खतासाठी होणारी भटकंती थांबली आहे. या गोष्टीचे मनाला समाधान असल्याचा भावना संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केल्या. पेरणी महोत्सवाला शेतकर्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. शेतकर्यांनी बांधावर खतासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रुईखेड टेकाळे Ruikhed Tekale येथील शेतकर्यांनी ६०० बॅग खताची नोंदणी केली होती. त्यानुसार या गावामध्ये ६०० बॅग खत वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच बबनराव टेकाळे, माजी उपसरपंच शेषराव टेकाळे, ग्रा. पं. सदस्य अर्जुन पाटील, सुधाकर टेकाळे, गोकुळा टेकाळे, विठ्ठल टेकाळे, अनिल खंबायतकर, पंजाबराव टेकाळे, रवींद्र खेडेकर, उत्तम खंबायतकर, सुनील टेकाळे, बंडू टेकाळे, गणेश टेकाळे, भागवत टेकाळे, गजानन भानुसे, बबन टेकाळे, प्रमोद टेकाळे, रवींद्र टेकाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.