जनआंदोलनाचा इशारा देतांच खड्ड्याची तातडीने दुरुस्ती

Urgent repair of pothole after warning of public agitation

जनआंदोलनाचा इशारा देतांच खड्ड्याची तातडीने दुरुस्ती

बुलढाणा न्यूज / चिखली
चिखली शहरातील नवीन डी.पी.रोडवरील On the new DP road in Chikhali city आशीर्वाद मेडिकल समोरील प्राणघातक खड्ड्याबाबत रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी शनिवार, दि. २४ मे २०२५ रोजी नगर पालिका प्रशासनाकडे दिलेल्या तीव्र निवेदनाची तातडीने दखल घेण्यात आली आहे. या खड्ड्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते. शाळा, हॉस्पिटल, मेडिकल व रहिवासी परिसर जोडणार्‍या या मुख्य रस्त्यावर अपुर्‍या देखभालीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे प्रशांत ढोरे पाटील यांनी प्रशासनास केवळ पाच दिवसांची मुदत देत, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला होता.

या निवेदनानंतर केवळ २४ तासांच्या आत नगर पालिकेने जागरूकता दाखवत सदर खड्ड्याची तातडीने दुरुस्ती सुरू केली आणि पूर्ण केली. या कार्यवाहीमुळे नागरिकांत समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे. प्रशांत ढोरे पाटील Prashant Dhore Patil यांनी नगरपालिकेचे विशेष आभार मानले असून, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन वेळेवर निर्णय घेणार्‍या प्रशासनाचे आम्ही मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले.

या घटनेवरून स्पष्ट होते की, जागरूक नागरिकांची भूमिका आणि संयमित पण ठाम आंदोलनाची भाषा ही प्रशासनाच्या कामकाजाला वेग देऊ शकते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे जबाबदार नेतृत्व आवश्यक आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें