गाळ मुक्त धरण ही योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने दरवर्षी अंदाजपत्रकात वेगळी तरतूद करून ठेवली आहे : शांतीलाल मुथा

बुलढाणा न्यूज

      बुलढाणा न्यूज- गाळ मुक्त धरण ही योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने दरवर्षी अंदाजपत्रकात वेगळी तरतूद करून ठेवली आहे व सतत पाच वर्षापर्यंत ही योजना कार्यान्वित राहील व सर्व आराखडे हे संबंधित यंत्रणा तयार करणार आहे. यासाठी BJS चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सांगितले.
           पुढे बोलतांना मुथा यांनी सांगितले की, राज्यात भारतीय जैन संघटना, नाम फाउंडेशन व टाटा ट्रस्ट या एनजीओच्या साह्याने महाराष्ट्र शासन हे जलसंधारण विभागाचे माध्यमातून संपूर्ण राज्यात पाणी आडवा पाणी जिरवासाठी प्रत्येक धरणातील व मोठमोठ्या नाल्यातील गाळ काढून राज्यातील प्रत्येक क्षेत्र टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे यापूर्वी BJS गेल्या १३ वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे व गाळमुक्त धरण ही योजना राबविताना कोट्यावधी रुपये जनतेसाठी खर्च केलेले आहे बुलडाणा जिल्ह्यात २०१८ मध्ये बीजेएसने स्वतः १०० जेसीबी व १४ पोकलेन मशीनद्वारे भरीव कामगिरी केलेली आहे व या कामाची पावती म्हणून केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून देशातील शंभर जिल्ह्यामध्ये बीजेएस चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांना काम करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले व या १०० जिल्ह्यात सुद्धा यशस्वी कामगिरी बजावल्यानंतर BJS असा निर्णय घेतला की आता राज्य शासनाबरोबर एम ओ यु करून सर्व यंत्रणा ही शासनाची असेल व नदी नाले धरण यातील गाळ काढण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे ग्रामपंचायत व एनजीओ यांचे मार्फत गाळ काढण्याचे कामाला सुरुवात करतील या प्रक्रियेत इगड तळागाळापर्यंत जाऊन या कामाचा प्रचार प्रसार करेल व शासनाचे प्रतिनिधीला वेळोवेळी जी मदत लागेल ती मदत करेल गाळ काढल्याने भविष्यात किती फायदे होतात याबाबत सुद्धा BJS प्रचार प्रसार करणार आहे.
          गाळ मुक्त धरण ही योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने दरवर्षी अंदाजपत्रकात वेगळी तरतूद करून ठेवली आहे व सतत पाच वर्षापर्यंत ही योजना कार्यान्वित राहील व सर्व आराखडे हे संबंधित यंत्रणा तयार करणार आहे. यासाठी BJS चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार सांकला, राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य अध्यक्ष केतन शहा,राज्यसचिव प्रवीण पारक व सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य विभागीय अध्यक्ष व सचिव सर्व जिल्हाध्यक्ष व सचिव व सर्व तालुकास्तरीय कार्यकर्ते यांची संयुक्तिक मिटींग दिनांक १ मार्च रोजी पुणे येथे आयोजित केली आहे. त्यापूर्वी या सर्वांसोबत झूम मिटींग द्वारे संवाद साधून इगड ला काय-काय काम करायचे आहे याबाबत सखोल मंथन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें