Union Minister Mr. Prataparao Jadhav interacted with the officials and settled the complaints on the spot.
बुलढाणा न्यूज : केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे आज २ जानेवारी २०२५ रोजी बुलढाणा दौर्यावर आले असता त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या जनसंपर्क लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकार्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना येणार्या अडचणी संदर्भात त्यांनी थेट संबंधित अधिकार्यांशी संवाद साधून तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा केला.
त्यानंतर माध्यम प्रतिनिधीशी औपचारिक चर्चा करताना असतांना ते म्हणाले की,
उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची खासदार संजय राऊत यांनी मनोमन जी प्रतिज्ञा केली होती. त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
पवार कुटुंबियांचे राजकारणामध्ये दिशा आणि विचार जरी वेगळे असले तरी ते आजपर्यंत कौटुंबिक संबंध जोपासत आले आहेत. अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र येत असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठ आणि २ कुटुंबप्रमुख म्हणून पवार कुटुंब एकत्र यावे यासाठी आशाताई पवार यांनी विठ्ठलाला साकडे घातले असेल तर त्याचा विचार शरद पवार आणि अजित पवार करतील असे ते म्हणाले. गेल्या वेळी मंत्र्यांची संख्या कमी होती. यावेळी ती वाढली आहे, येत्या दोन दिवसात सर्वमंत्री आपला पदभार स्वीकारतील आणि पालकमंत्रीपद जाहीर होतील असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.