अवैध धंद्याला थारा न देता अधिकार्‍यांनी जबाबदारीने काम करावे: नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे

समन्वय समितीच्या आढावा बैठकीत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सूचना

Officials should act responsibly without allowing illegal business: Newly elected MLA Manoj Kayande

       बुलढाणा न्यूज – सुसंस्कृत आणि विकसित मातृतीर्थ मतदारसंघ घडविण्याचा संकल्प मी केला आहे. यासाठी अवैध धंद्याला थारा न देता प्रशासनातील अधिकार्‍यांनी जबाबदारीने काम करावे असे आवाहन समन्वय समितीच्या पहिल्याच बैठकीत आमदार मनोज कायंदे यांनी केले.देऊळगाव राजा नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित समन्वय समितीच्या आढावा बैठकीत दोन्ही तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासमोर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित आ. मनोज कायंदे यांचे सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

       यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी प्रास्ताविक करताना मतदारसंघातील सर्व विभागाची माहिती विषद केली. सभेच्या अध्यक्षस्थानी आ.मनोज कायंदे होते. तर व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड,तहसीलदार वैशाली डोंगरजाळ दे. राजा, तहसीलदार अजीत दिवटे सिं.राजा, मुख्याधिकारी अरुण मोकळ, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, लोणार चे गटविकास अधिकारी देशमुख,खडकपूर्णा प्रकल्पाचे अभियंता नितीन डोईफोडे, मतदार संघातील पोलीस स्टेशनचे सर्व ठाणेदार यांचेसह सतीश कायंदे,भाजप नेते भगवान मुंडे,शेतकरी नेते प्रकाश गिते, प्रा. दिलीप सानप,सदाशिव मुंडे,गजानन काकड, नितीन कायंदे प्रदिप वाघ सुनिल शेजुळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ.कायंदे यांनी मतदारसंघातील प्रशासकीय कामांचा व शासकीय योजना संदर्भात आढावा घेतांना कृषी विभाग,आरोग्य विभाग, वीज वितरण आणि पोलीस विभागातील अधिकार्‍यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या. अधिकार्‍यांशी संवाद साधताना ते म्हणाले की माझ्या कार्यकर्त्याकडून कुठल्याही अधिकार्‍यांना त्रास होणार नाही याची मी ग्वाही देतो मात्र सामान्य नागरिकांना त्यांची कामे करताना त्रास होणार नाही याची दक्षता तुम्ही बाळगा असे सूचक निर्देश त्यांनी दिले.
         

            नवनिर्वाचित आ.मनोज कायंदे यांच्या सूचनेवरून आयोजित समन्वय समितीच्या आढावा बैठकीत सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीदरम्यान आ.कायंदे व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. काझी यांनी विविध प्रश्नावर उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना बुलडाण्यातील बसस्थानकात अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें