what do you say Govt decision issued to facilitate transfer of Community Health Officers
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
बुलढाणा न्यूज – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या बदलीचा मार्ग सुकर झाला असून या संदर्भाततील शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांची बदली होत नव्हती . या अभियानांतर्गत नोकरीला लागल्यानंतर एकाच पदावर एकाच ठिकाणी कर्मचार्यांना काम करावे लागत होते या विभागांतर्गत काम करत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकार्यांनी त्यांच्या बदली संदर्भातील विनंती केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव Union Minister of State for AYUSH Health and Family Welfare Prataprao Jadhavयांच्याकडे केली होती.
या अधिकार्यांच्या बदली विनंती संदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता या पाठपुराव्याला यश आले असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकार्यांना संपूर्ण सेवा कालावधीत एक वेळ विशेष बाब म्हणून बदली करण्यास राज्य शासनाने मंजुरात दिली आहे या संदर्भातील शासन निर्णय मंगळवार, दि.१० डिसेंबर २०२४ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या बदलीचा मार्ग सुकर झाला आहे.