Appointment of Chandrakant Barde as Buldana District Secretary of Bharatiya Janata Party
बुलडाणा – भारतीय जनता पार्टीच्या बुलडाणा जिल्हा चिटणीसपदी चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांन्टे यांनी केली. यावेळी बुलडाणा लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे, किसान मोर्चाचे महाराष्ट्र सचिव दिपक वारे, अनंता शिंदे आदि उपस्थित होते.
श्री. चंद्रकांत बर्दे यांनी काही दिवसापुर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वस ठेवुन भाजपात प्रवेश केला होता. त्यांचा राजकीय, सामाजीक व पत्रकारीतेतील अनुभव व काम लक्षात घेता दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांन्टे यांनी नियुक्ती पत्र देवुन त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे. जबाबदारी मिळताच आपण जिल्ह्यात पक्ष व संघटना वाढीकरीता काम करणार असल्याची प्रतिक्रीया यावेळी त्यांनी दिली. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हाभरातुन भाजपाच्या पदाधिकारींनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
जगभरात आयुष क्षेत्राचा स्वीकार वाढत आहे: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव