Push the passenger boats in the ghat
बुलढाणा आगाराच्या भंगार बसचा प्रवाशांना त्रास
बुलढाणा : बुलढाणा आगारातील भंगार बस Scrap Bus in Buldhana Agar बहुसंख्येने बसेस रस्त्यावर धावत आहे. बसेसच्या मेंटनन्सकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. दिन जाव पैसा आव अशा प्रकाराममुळे या भंगार बसेस कुठेही महामार्गावर बंद पडत आहेत. घाटात लोड घेत नाही, या भंगार बसेसमुळे प्रवाशी वर्गाचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे याचा नाहक मानसिक त्रास प्रवाशांना होत आहे. अशीच घटना दीपावलीच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवार, दिनांक ३१ आक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बस क्रमांक ९९४७ ही बस बुलडाणा-खामगाव मार्गावरील असतांना बोथा घाटात घडली आहे.
या बाबत प्राप्त माहीती अशी की, बुलढाणा आगाराची बस दुपारी अमरावती येथून निघाली होती. परंतु खामगाव मार्ग बुलढाणाकडे येत असतांना. या बसमध्ये सणासुदीचा अत्यंत महत्वाचा दिवाळीचा दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी तुफान होती. अशातच बोथाघाट चढत असतांना ही बस लोड घेत नव्हती. त्यामुळे चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरून दिले. प्रवाशाना पूर्ण घाट पायी चालत पार करावे लागले. यामध्ये वृध्द, महिला, लहान मुले घाटपार करत होते. बोथाघाट हा ज्ञानगंगा अभयारण्य असून या ठिकाणी बिबट, वाघ, अस्वल, तडस सारखे अनेक हिंस्र प्राण्याचे वास्तव आहे. भर जंगलात वृध्द, लहान मुले प्रवाशांना पायी चालावे लागले, अशात एखाद्या वन्यप्राण्यांने प्रवाशावर हल्ला केला असता तर याला कुठला अधिकारी जबाबदार असता व कोणी त्या प्रवाशांना कोणी आर्थिक मदत दिली असती असा प्रश्न निर्माण होत आहे? बुलढाणा आगार व्यवस्थापकाने लक्ष घालून लांब पल्ल्याला जाणार्या बसेसच्या मॅटेनसकडे लक्ष द्यावे जेणेकरून प्रवाशांना अशा प्रकारच्या अडचणीचा सामना व मनस्ताप करावा लागणार नाही. लांब पल्याच्या बसेसची अशी स्थिती आहे तर इतर साधारण बससेवेचे काय? असा प्रश्न उपस्थीत होतो.
प्रवाशांच्या सेवेसाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय, सुखकर प्रवास एसटीचा प्रवास हे ब्रीद वाक्य जनमाणसात एसटीची प्रतिमा वाढवण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून सदर दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी प्रवासी वर्गाची असून एसटी प्रशासनाकडे मागणी केल्या जात आहेे.
जगभरात आयुष क्षेत्राचा स्वीकार वाढत आहे: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव