The ‘Father’ of India’s industry has been lost
बुलढाणा न्यूज ः
टाटा उद्योग समूहाचे
सर्वेसर्वा तसेच जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे काल बुधवारी,दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी उपचारादरम्यान निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने
केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.
रतन टाटा यांना प्रकृती खालावल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोशल मीडियाद्वारे सामान्यांद्वारे श्रद्धांजली वाहिली जात आहे.