अंगणवाडी कर्मचारी संघटने बुलढाणा शहर अध्यक्षपदी शारदा इंगळे

Anganwadi Employees Association Buldhana City Sharda Ingle as President

         बुलढाणा न्यूजः सीआयटीयू ,सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या बुलढाणा शहरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीसांचा मेळावा शनिवार, दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी लोककवी वामनदादा कर्डक सभागृह मिलिंद नगर येथे सी आय टी यु चे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.

          सरकारने नुकताच शुक्रवार, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनात In remuneration of Anganwadi Sevika Helpers प्रत्येकी ५००० रुपये व ३००० रुपयाची वाढ करण्याचा जो निर्णय घेतला त्याचे संघटनेच्या वतीने स्वागत करून सरकारला त्याबद्दल धन्यवाद सुद्धा दिले. परंतु निवृत्तीया उंबरठ्यावर असलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शन आणि ग्रॅज्युएटीच्या महत्त्वाच्या मागणीच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रश्नाकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केले. त्याबद्दल मात्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी संघटनेच्या वतीने प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यासाठी आगामी काळात संघटनेच्या वतीने राज्यभर मोठा लढा उभा करण्यात येईल असा इशाराही सरकारला या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेची बुलढाणा शहर कमिटी गठीत Buldhana City Committee करण्यात आली.

        शहराध्यक्षपदी शारदा इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी दिपाली एंडोले, सचिव पदी सुवर्णलता सुरडकर, कोषाध्यक्षपदी अनिता ठाकरे, सहसचिव स्वाती वाघ, ममता पुरवार या प्रमुख पदाधिकार्‍यांची निवड करण्यात येऊन शहर कमिटी सदस्य म्हणून संगीता लाटे, प्रतिभा आराख, सीमा होळकर, प्रियंका जाधव, सुवर्णा हिवाळे आणि सुरेखा निकाळजे इत्यादी सह तेरा सदस्यांची शहर कमिटी गठीत करण्यात आली. या मेळाव्याला बुलढाणा शहरातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

बी.ए.एम.एस डॉक्टर आता कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून होणार रुजु : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

रविवारला चंद्रकांत झटाले यांचे व्याख्यान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें