आदिवासीनो उठा..  जागे व्हा.. जागे व्हावेच लागेल..!!!      : आदिवासी साहित्यिक रामराजे आत्राम

बुलढाणा न्यूज : भारत देश सद्य:स्थितीत आर्थिक अराजकातेमध्ये ढकलल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.सत्ताधारी राजकारणी आणि राजकीय पक्ष आदिवासी आणि नागरिकांच्या हिताचे राजकारण करत नाही.देशातील असुरक्षित, भ्रष्ट आणि भ्रष्टाचारी राजकारणामुळे माणसाच्या जगण्याच्या बदलते संदर्भ  आदिवासीसाठी पोषक नसून घातक आहे.आदिवासी आपल्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी प्रयत्न करतो आहे.

               आदिवासीच्या संस्कृती,रूढी परंपरांवर त्यांच्या संपत्ती,जल-जंगल-  जमिनीवर घाला घातला जात आहे.त्यांना परगंदा केल्या जात आहे.  यासाठी आदिवासी जागा झाला तरच या संकटाला परतवता येईल असे विचार लातूर येथून आलेले आदिवासी साहित्यिक रामराजे आत्राम यांनी बुलढाणा येथे संपन्न झालेल्या ६व्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनातील वर्तमान परिस्थिती आणि संदर्भ,आदिवासीचे अस्तित्व आणि अस्मितेसाठी किती पोषक किती घातक  या परिसंवादाच्या अध्यक्षस्थाहून बोलतांना मांडले.        
   

      परिसंवादतील इतर सहभागी वक्त्यांमध्ये किरण डोंगरदिवे, मेहकर, डॉ. प्रदीप हिरापुरे नागपूर, प्रा विठ्ठल आत्राम राजुरा यांनी विषयाला अनुरूप विचार मांडले.यावेळी सभागृहात प्रा डॉ विनायक तुमराम,झारखंड येथून आलेल्या खडिया बोलीभाषा अभ्यासक तथा तज्ञ वंदना टेटे, प्रा.डॉ.गोविंद गायकी,सुनिल कुमरे,सुनीता बारेला, बालसाहित्यक सुभाष किन्होळकर,डॉ अजय खडसे,महादेव सिडाम,दिलीप फुलसुंगे कवी मांगीलाल राठोड प्राचार्य अविनाश मेश्राम,शशिकांत इंगळे इत्यादीसह साहित्यिक व साहित्यरसिक विद्यार्थी,विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.         परिसंवादाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन साहित्यिक सुरेश साबळे यांनी तर आभार कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांनी मानले.    

 

गावा-गावात जावून रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार-  माजी आमदार राहुल  बोंद्रे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें