बी.ए.एम.एस डॉक्टर आता कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून होणार रुजु : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
BAMS doctors will now be posted as contract medical officers: Union Minister Prataprao Jadhav
24 सप्टेंबरला निघाला शासन निर्णय
बुलढाणा : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ” ब ” या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर बी ए एम एस अहर्ताधारकांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याचे निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला दिले होते त्या निर्देशानुसार 24 सप्टेंबरला आरोग्य विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे त्यामुळे आता बी ए एम एस डॉक्टरांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळणार आहे.
राज्यातील उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्र , फिरती दवाखाने यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ” ब ” या संवर्गातील पद रिक्त आहेत .त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ” ब ” या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर बी ए एम एस अहर्ताधारकांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याचे निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला दिले होते संदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 24 सप्टेंबरला निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयामुळे आता बी ए एम एस डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत घेता येणार आहे त्यामुळे आयुर्वेदिक / ॲलोपथिक दवाखाने प्राथमिक आरोग्य पथके / फिरती पथके,जिल्हा परिषदेची दवाखाने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील रिक्त पदांवर बी ए एम एस अहर्ता धारकांना आता कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळणार आहे . राज्य शासनाच्या या निर्णयामुळे प्रत्येक रुग्णालयाला आता वैद्यकीय अधिकारी मिळणार आहे तसेच प्रशासकीय कामकाजावरील ताण कमी होऊन आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे . हा शासन निर्णय सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचं हित जोपासून तत्पर आरोग्य सुविधा उपलब्घ करून देणारा आहे अशी प्रतिक्रिया आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.
गावा-गावात जावून रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार- माजी आमदार राहुल बोंद्रे
१० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजर जागा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा
नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत जाहिर करा : अॅड.जयश्री शेळके
जवान विजय जाधव यांच्यावर खंडाळा मकरध्वज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार