जवान विजय जाधव यांच्यावर खंडाळा मकरध्वज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Jawan Vijay Jadhav was cremated in a mournful atmosphere at Khandala Makardhwaj

          चिखली : मूळगावी चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज असलेल्या सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सचे जवान विजय शंकर जाधव यांना कर्तव्यावर असताना मेंदूत रक्तस्राव झाला होता. दरम्यान त्यांना पंधरा दिवसापूर्वी नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४ रोजी प्राणज्योती मालवली. त्याचेवर मूळगावी चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सची टीम, माजी सैनिक संघटना, समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली.

        खंडाळा मकरध्वज येथील विजय शंकर जाधव यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९८५ सालचा. मात्र बालपणीच पाचवीत असताना त्यांचे मायेचे छत्र हरवले. प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत गावातच झाल्यानंतर सातवीनंतर चिखली येथे शिवाजी विद्यालयात शिकत असताना त्यांनी एनसीसीचे टेकर अंडर ऑफिसर म्हणून काम केले. मोठा भाऊ राजू जाधव हा सैन्यात असल्यामुळे विजयची सुद्धा सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्यानुसार २००६ मध्ये ते सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स मध्ये भरती झाले. त्यानंतर त्यांनी मिझोरम, निमाचछ, छत्तीसगड व गडचिरोली या नक्षलवादी भागात कर्तव्य बजावले.

             यावेळी माजी आ.राहुल बोंद्रे, आ. श्वेता महाले, ठाणेदार संग्राम पाटील, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड,भूमी मुक्तीमोर्चा संघटना अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे, माजी सैनिक भीमराव भिसे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शोक संवेदना व्यक्त केल्या. यामध्ये भाई प्रदीप अंभोरे यांनी विजय जाधव स्मृती स्मारक बांधण्याची मागणी केली. यावेळी सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स नागपूरचे पोलीस निरीक्षक पी.श्रीनिवासन,मदन देशमुख यांचे टीमने हवेत पाच फेरी झाडून सलामी दिली. तसेच माजी सैनिक संघटना, समता सैनिक दलाच्या वतीनेही मानवंदना देण्यात आली.यावेळी एनसीसी ऑफिसर निकम, सरपंच उज्वला जाधव, पोलीस पाटील विजया पंडागळे,संदीप शेळके, समाधान सुपेकर, प्रा. राजू गवई, प्रशांत ढोरे,प्रदीप वाकोडे, हिम्मत जाधव, मधुकर मिसाळ, कुणाल बोंद्रे, कपिल खेडेकर, शिवाजी देशमुख, विनायक सरनाईक, नारायण खंडारे, प्रदीप गवईसर, गणेश धुंदळे यांचेसह माजी सैनिक संघटना, समता सैनिक दल, विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शोकाकुल वातावरणात मुलासह वडील शंकर जाधव, भाऊ राजू जाधव यांनी चिताग्नी दिला. जवान विजय जाधव यांच्या पश्चात वडील, भाऊ, दोन बहिणी, पत्नी कांचन, मुलगा विहान व श्रेयान व बराच मोठा प्राप्त परिवार आहे.

नक्षलयांशी चकमक

         गडचिरोली येथे कर्तव्यावर असताना एक नक्षलवादी महिला व चार नक्षली पुरुष यांना आत्मसमर्पण करण्यास त्यांनी प्रवृत्त केले. त्यांचे आत्मसमर्पण मोहीम पूर्ण करत असताना नक्षलयांशी चकमक झाली व त्यात एक गोळी विजय जाधव यांच्या खांद्याला स्पर्श गेली. त्यावेळी ते थोडक्यात बचावले. यासह इतरही महत्त्वपूर्ण मोहिमेत त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यामुळेच वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांचा सन्मान देखील केला होता. त्यांचे पार्थिव नागपूर येथून कार्यालयीन कामकाज आटवून शनिवारी रात्री त्यांचे मोठे बंधू माजी सैनिक राजू जाधव यांच्या चिखलीस्थित निवासस्थानी आणले. रविवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी अंत्य दर्शनासाठी ठेवून चिखली शहरातून विजय जाधव अमर रहे च्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मूळगावी खंडाळा मकरध्वज येथे त्यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुलढाण्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान

https://buldhananews.com/2112/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें