बुलढाणा: येथे आझाद ग्रुपचा स्नेहमिलन सोहळा तसेच लेखक, विचारवंत चंद्रकांत झटाले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक चळवळी सद्यस्थिती व भविष्यातील आव्हाने यावर झटाले विचारपुष्प गुंफणार आहे.
‘लोकहित सर्वतोपरी’ हे ब्रीद घेऊन पुणे येथील उद्योजक भीमाशंकर मामा कापसे यांनी आझाद ग्रुपची स्थापना पुणे येथे केली. राज्यभर ग्रुपचे सदस्य जोडले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील गावाखेड्यातून आलेला व कुठलीही पार्श्वभूमी नसलेला हा माणूस आज उद्योग व राज्याच्या समाजकारणासी जोडला गेला आहे. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण, कृषी, विज्ञान, उद्योग, साहित्य, सांस्कृतिक, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा या दस सुत्रीच्या अंमलबजावणीसाठी भीमाशंकर कापसे यांनी राज्यस्तरीय पावूल उचलले आहे. बुलढाणा येथे आझाद ग्रुपचा स्नेहमिलन सोहळा तसेच लेखक, विचारवंत चंद्रकांत झटाले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक चळवळी सद्यस्थिती व भविष्यातील आव्हाने यावर झटाले विचारपुष्प गुंफणार आहे.
जिजामाता कॉलेज येथे रविवार, दि.22 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता सदर व्याख्यान होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भीमाशंकर मामा कापसे संस्थापक अध्यक्ष आझाद ग्रुप महाराष्ट्र राज्य हे राहणार असून अदिती अर्बनचे संस्थापक सुरेश देवकर, बाळासाहेब टोपरे सरपंच तथा मराठवाडा संघटक आझाद ग्रुप, प्रसाद पोले राज्य संघटक, गोविंद पवार प्रसिद्धीप्रमुख मराठवाडा, दीपक रायफळे प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रभाकर पांडे जिल्हाध्यक्ष नांदेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
चंद्रकांत झटाले हे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांची टोकदार लेखणी विविध सामाजिक समस्यांचा परामर्श घेत आली आहे. त्यांना भेटण्याची संधी बुलढाणाकरांना यानिमित्ताने आहे. सामाजिक चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आझाद ग्रुपचे राज्यध्यक्ष प्रमोद टाले, राज्य जनसंपर्कप्रमुख पत्रकार गणेश निकम, विदर्भ प्रांत अध्यक्ष संजय खांडवे, जिल्हाध्यक्ष मदन काठोळे, जिल्हा संघटक विशाल आढाव यांनी केले आहे.